आळंदीत महाराजाने केले शाळकरी मुलीवर अत्याचार, कृत्यामुळे वारकरी परंपरेला लागला बट्टा

By: Editor_Pratik

On: Thursday, January 30, 2025 7:48 AM

लैंगिक अत्याचार अत्याचार
Google News
Follow Us

वारकरी संप्रदायाला एक वारसा आहे. संस्कृती परंपरा आहे. वारकरी संप्रदायातील चांगल्या गोष्टींचे प्रचार प्रसार करण्याचे कार्य महाराज करत असतात. आपल्या ज्ञानाने, कीर्तनाने नवीन वारकरी घडविण्याचे कार्य महाराज मंडळी करत असतात पण पुणे शहरात चक्क संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या आळंदीत भागवत धर्माला तडा जाईल अशी एक घटना घडली आहे.

घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण वारकरी समाजातून निषेध व्यक्त केला जात आहे. पिंपरी चिंचवड भागामध्ये चक्क आळंदीतील वारकरी शिक्षण संस्थेच्या एका तेरा वर्षीय मुलीवर विनयभंग केल्याचा आरोप महाराजांवर करण्यात आलेला आहे. या घटनेचा छडा लागताच पोलिसांनी या महाराजाला त्वरित अटक केलेली आहे. आपल्या सर्वांना माहितीच आहे की, आळंदी येथे नवीन पिढीला कीर्तनाचे धडे शिकवले जातात

आळंदी येथे एका महाराजांनी तेरा वर्षाच्या अल्पावयीन मुलीवर विनयभंग केल्याची घटना घडलेली आहे. हा महाराज गेल्या चार महिन्यापासून या मुलीचे विनयभंग करत होता तसेच वेगवेगळ्या प्रकारे अत्याचार करून शोषण करत होता. हा सर्व प्रकार या मुलीने आपल्या आईला सांगितल्यानंतर आईने त्वरितच जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आणि या आरोपी महाराजाला त्वरितच पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार आरोपी महाराजांचे नाव किरण महाराज ठोसर असं आहे. घडलेल्या प्रकार हा दुर्दैवी असून या महाराजांवर त्वरित पोलिसांनी कारवाई करायला सुरुवात केली आहे त्याचबरोबर पोक्सो कायद्याअंतर्गत महाराजांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास देखील करत आहेत. घडलेली घटना दुर्दैवी असल्याने वारकरी समाज आणि भागवत संप्रदायातून या गोष्टीचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

March 13, 2026

March 13, 2026

March 13, 2026

March 13, 2026

March 13, 2026

March 13, 2026