आळंदीत महाराजाने केला दोन विद्यार्थ्यांवर बलात्कार; वारकरी संप्रदाय हादरला!

By: Editor_Pratik

On: Tuesday, January 7, 2025 6:45 AM

बलात्कार अत्याचार
Google News
Follow Us

पुणे प्रहार डेस्क – वारकरी संप्रदायाला हजारो वर्षांची परंपरा आहे. वारकरी संप्रदाय अंतर्गत अनेक संत मंडळी कीर्तनाचे धडे घेत असतात. कीर्तनाच्या माध्यमातून समाजामध्ये चांगल्या गोष्टीचे बीजारोपण करण्याचे कार्य महाराज करत असतात परंतु पुणे आळंदी येथील एका महाराजाच्या कृत्याने अख्या वारकरी संप्रदायाला लाजावेल असा प्रसंग घडलेला आहे.

आळंदी येथील एका वारकरी शिक्षण संस्थेत शिक्षण घेणाऱ्या दोन अल्प वयीन वारकरी साधक विद्यार्थ्यांवर एका महाराजांनी बलात्कार केल्याची घटना समोर आलेली आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या घटनेत नराधम महाराजाला एका महिलेने मदत केल्याने मोठी खळबळ माजली आहे.

ही घटना शनिवारी घडली आहे. या घडलेल्या घटने मुळे वारकरी संप्रदायातून नाराजीचा सूर येत आहे तसेच या संप्रदायातून या गोष्टीचा निषेध देखील व्यक्त केला जात आहे.

ही घटना आळंदी येथील ज्ञानेश्वरी गुरुकुल संस्थेत घडल्याने अन्य विद्यार्थी साधकांच्या मनात आता भीती निर्माण झालेली आहे.

आळंदी म्हणजे वारकऱ्यांसाठी प्रति पंढरपूर आहे. आळंदीत संत ज्ञानेश्वर यांची नवसंजीवनी आहे परंतु खुद्द ज्ञानेश्वरांच्या आज समाधी शहरांमध्ये असा प्रसंग घडल्याने संपूर्ण वारकरी संप्रदाय आता हादरलेला आहे.

घडलेल्या या प्रकरणाबाबत आळंदी पोलिसांनी आरोपी विरोधात पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केलेला असून या नराधम महाराजाला अटक करण्यात आलेली आहे.
महेश नामदेव मिसाळ अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. साथीदार महिला पळालेली असून या महिलेचा शोध घेण्यात येत आहे परंतु तिला अजून अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

पोलिसांना मिळालेल्या अधिक माहितीनुसार, आळंदी हद्दीत वडगाव रस्त्याला वारकरी शिक्षण संस्था आहे. येथे ज्ञानेश्वरी गुरुकुल ही खाजगी संस्था विद्यार्थ्यांना वारकरी संप्रदायाबद्दल शिक्षण देत असते. कीर्तन अध्यात्मिक ज्ञान या संस्थेच्या माध्यमातून पुरविले जाते. या संस्थेमध्ये आरोपी देखरेखीचे काम पाहायचा परंतु शनिवारी रात्री आरोपी पीडित मुलांच्या खोलीत जाऊन त्यांच्या शेजारी झोपला आणि त्यानंतर त्याने मुलांसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मुलांवर केलेल्या अस नैसर्गिक लैंगिक संबंधांमुळे पोलिसांनी पॉस्को या कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे.

हा घडलेला सर्व प्रकार महिलेला कळाल्यानंतर तिने हा प्रकार लपवण्याचा प्रयत्न केला परंतु मुलांनी घडलेल्या प्रकार आपल्या पालकांना सांगितला. त्यानंतर पालकांनी त्वरित जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आणि घडलेल्या प्रकार पोलिसांनी सांगितला. हा प्रकार कळताच पोलिसांनी ज्ञानेश्वरी खाजगी संस्थेत जाऊन आरोपीला अटक केले. या घटनेचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षण भीमा नरके यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास केला जात आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now