घरफोडी करणाऱ्या आंतरराज्यीय अट्टल गुन्हेगार जेलबंद ; १६ लाखांहून अधिकचा मुद्देमाल हस्तगत

By: Editor_Pratik

On: Thursday, January 30, 2025 7:46 AM

दंड खंडणी गुन्हेगार
Google News
Follow Us

पुणे प्रहार डेस्क – पुणे शहरामध्ये चोरीच्या घटनांना काही वेग लागायचे नावच घेत नाहीये त्याचबरोबर पुणे शहरामध्ये चोरी करणारे अट्टल चोर तर आहेच पण त्याचबरोबर बाहेरच्या राज्यातून येणारे चोर देखील आता पुण्यामध्ये येऊन चोरी करत आहे म्हणूनच पुणे शहर पोलीस प्रशासनाच्या डोकेदुखी मध्ये वाढ होताना दिसून येत आहे. तरीही पोलीस प्रशासन चोरांना धडा शिकवण्याचे कार्य करत आहेत. गुजरात कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यात ठिकठिकाणी चोरी घरफोड्या करणाऱ्या एका अट्टल गुन्हेगाराला पुणे पोलीस प्रशासनाने अटक केलेली आहे. या केलेल्या कामगिरीमुळे पोलीस प्रशासनाचे कौतुक देखील करण्यात येत आहे.

एका अट्टल आंतरराज्यीय गुन्हेगाराला पकडण्याचे धाडस स्थानिक गुन्हे अन्वेषण ग्रामीण शाखेच्या पोलिसांनी केलेले आहे. ही कारवाई पुणे सातारा रोडवरील सासेवाडी परिसरात करण्यात आलेली आहे. या अट्टल गुन्हेगाराकडून पोलिसांनी रोख रक्कम आठ तोळे सोन्याचे दागिने, दोन किलो चांदीची भांडी असे तब्बल 16 लाख रुपये पेक्षा जास्त ऐवज जप्त केलेला आहे.

या कारवाईत अटक करण्यात आलेल्या या चोराचे नाव लखन अशोक कुलकर्णी ऊर्फ सचिन राजू माने
असे आहे. आरोपी लखन कुलकर्णी वर आतापर्यंत गुजरात कर्नाटक महाराष्ट्रात राज्यात 50 पेक्षा अधिक गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर लखनने कर्नाटक शहरात चोरी केलेल्या प्रकरणात सात वर्ष शिक्षा देखील भोगलेली होती, तरीही या चोराने अन्य राज्यांमध्ये चोरी करण्याचे प्रयत्न सुरूच ठेवले आहेत अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

या पकडलेल्या चोरामुळे भविष्यात अनेक माहिती मिळण्याची मदत देखील होईल त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यात तसेच राज्य बाहेर चोरांचे वाढलेले कनेक्शन व नेटवर्क यांची माहिती देखील मिळेल असे देखील प्रतिपादन पत्रकार परिषदेत पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली.

13 जानेवारी रोजी पहाटे भोर शहरात श्रीपती नगर मध्ये चार घरांचे अज्ञात चोरट्याने कुलक तोडून घरातील रोकड व सोने-चांदी लंपास केले होते. या संदर्भातील तक्रार माधव पुरोहित यांनी भोर पोलिस ठाण्यामध्ये केली होती त्यानुसारच पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी सीसीटीव्ही फुटेज द्वारे माहिती मिळवून चोर ज्या ज्या ठिकाणी गेले होते त्या ठिकाणी सापळा असून पोलिसांना चोरांना पकडण्यात यश आलेले आहे. एकंदरीत 26 लाख 35 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरांनी लंपास केलेला होता व त्यानंतर चोराला पकडल्यानंतर चोराकडे अधिक रोकड त्याचबरोबर सोने चांदी च्या वस्तू देखील सापडल्या आहेत. पोलीस याप्रकरणी अधिक तपास देखील करत आहेत.

भोर शहरातील ग्रामस्थांकडून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे कौतुक करण्यात येत आहे.

सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, भोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आण्णासाहेब पवार, गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक दत्ताजीराव मोहिते, अंमलदार बाळासाहेब खडके, अमोल शेडगे, मंगेश भगत, महेश बनकर, मंगेश थिगळे, विजय कांचन, धिरज जाधव, अजित भुजबळ, काशिनाथ राजापुरे, केतन खांडे, अतुल मोरे यांनी केली. आरोपीस न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी घेण्यात आलेली आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

March 13, 2026

March 13, 2026

March 13, 2026

March 13, 2026

March 13, 2026

March 13, 2026