पुणे प्रहार डेस्क – पुणे शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी प्रवृत्ती वाढताना दिसत आहेत. पोलिसांद्वारे केले जाणारे प्रयत्न कुठेतरी कमी होत आहे, असा संतप्त सवाल नागरिकांकडून केला जात आहे. कधी आत्महत्या, कधी खून, चोरी यासारख्या घटनांमुळे पुणे शहरात भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांच्या मनात असुरक्षितता वाढू लागलेली आहे. अनेकदा स्वतःकडे पैसे नसल्यामुळे आपण दुसऱ्यांकडून पैसे घेतो त्या पैशाचे व्याज देखील देत असतो अशा पद्धतीला सावकारी पद्धत देखील म्हटले जाते.
मोठ्या प्रमाणावर पसरली होती त्यानंतर पोलीस प्रशासनाच्या मोठ्या कारवाईमुळे सावकारी पद्धतीची बीजे बंद करण्यात आली होती परंतु आता पुन्हा सावकारी पद्धत समाजामध्ये रुजू होताना दिसून येत आहेत, त्याचाच फटका पुणे येथील चिंचवड स्टेशन येथे पाहायला मिळाला. सावकार च्या जाचा मुळे एका रिक्षावाल्याने कंटाळून आत्महत्या केल्याची घटना समोर आलेली आहे.
सावकाराच्या जाचा ला कंटाळून एका रिक्षावाल्याने घरामध्येच गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडलेली आहे. हि घटना शुक्रवारी दिनांक तीन जानेवारी रोजी घडली. ही घटना चिंचवड स्टेशन येथील साईबाबा नगर येथे घडली. या घटनेमुळे आजूबाजूला भीतीदायक वातावरण निर्माण झालेले आहे. त्यांचा मुलगा गणेश राजू राजभर यांनी निगडी पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात तक्रार देखील नोंदवली आहे.
रिक्षावाल्याच्या या आत्महत्या मुळे आरोपी विरोधात तक्रार नोंदवली असून आरोपीची नावे पुढीलप्रमाणे आहेत.
हनुमंता ऊर्फ अविनाश गुंडे (रा. घरकुल सोसायटी, चिखली), महादेव फुले (रा. आनंद नगर चिंचवड स्टेशन), राजीवकुमार ऊर्फ गुड्डू भैया (रा. पिंपळे सौदागर)
या प्रकरणात तपास केला असताना पोलिसांना माहिती मिळाली की, गणेश यांचे वडील राजू हे रिक्षा चालवायचे. रिक्षा खरेदी करण्यासाठी त्यांनी काही पैसे उसने घेतले होते परंतु पैशांचे व्याज देणे बाकी होते. व्याजाची रक्कम परत न केल्याच्या कारणावरून आरोपींनी घरात घुसून तुला मारू, कापून टाकू अशा विविध धमक्या द्यायला सुरुवात केली होती. वारंवार दिल्या जाणाऱ्या या धमक्यांना वैतागून शेवटी रिक्षा चालकाने आपले जीवनच संपवले. आत्महत्या करायला प्रवृत्त केल्याबद्दल तसेच सावकारी जाच पद्धत अंतर्गत आरोपीवर कायदेशीर कारवाई केली जाईल असे पोलिसांनी देखील सांगितले.