गाडीवर दंड आकारल्याचा राग मनात ठेवून भर रस्त्यात पोलिसांवर केली मारहाण, गुन्हेगारीने गाठला कळस !

पुणे प्रहार डेस्क – पुणे शहरामध्ये गुन्हेगारी इतकी वाढली आहे की अक्षरशः आता पुणे पोलीस अधिकाऱ्यांवरच मार खाण्याची वेळ आलेली आहे. वेळप्रसंगी पोलीस आपले घरदार बाजूला ठेवून सर्वसामान्य जनतेच्या संरक्षणासाठी समाजामध्ये कोणत्याही प्रकारची हानी होऊ नये याकरिता 24 तास बंदोबस्तामध्ये आपले कर्तव्य बजावत असतात.

अनेकदा प्रवास करत असताना वाहतूक पोलीस देखील जर एखादा व्यक्ती चुकला तर त्याच्याकडून दंड आकारात असतात परंतु आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक आहेत, जे मनामध्ये राग ठेवून नंतर त्याचा वचपा काढत असतात. अशीच एक घटना पुणे शहरांमध्ये घडलेली आहे. या घटनेमुळे थेट खाकी वर्दीवरच हात उचलण्यात आलेला आहे. या सर्व घटनेचा समाजातील सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे.

गाडीवर दंड आकारल्याचा राग मनामध्ये धरून एका तरुणांनी वाहतूक पोलिसांना भर रस्त्यामध्ये लाथा बुक्क्यांनी मारहाण केलेली आहे. ही घटना शुक्रवारी रोजी घडली. पुणे येथील मरकळ चौक आळंदी येथे हा सर्व प्रकार घडला. याप्रकरणी एका व्यक्तीला आळंदी पोलीस पोलिसांनी अटक देखील केली आहे. आरोपीचे नाव विजय नामदेव जरे आहे.

झालेल्या मारहाणी प्रकाराबद्दल आळंदी वाहतूक शाखेतील सहायक पोलिस उपनिरीक्षक अंकुश वाडेकर यांनी आळंदी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

तक्रारदार वाहतूक पोलीस अधिकारी वाडेकर हे मरकळ चौक येथे कर्तव्य बजावत असताना एका व्यक्तीने म्हणजेच आरोपी जरे याने यापूर्वी गाडीचा दंड आकारल्याचा राग मनामध्ये ठेवला होता व त्याचबरोबर स्थानिक असून गाडीवर असताना पावती कशाला बनवतो. तुला येथे राहायचे की नाही अशी धमकी दिली त्यानंतर आरोपी जरे याने वाडेकर यांनी घातलेल्या युनिफॉर्म पकडून जोरात खेचला आणि यामुळे त्यांची शर्ट वरील बटणे देखील तुटली.. त्यानंतर वाहतूक पोलीस वाडेकर यांच्या कानाखाली मारली.

अक्षरशः लाथा बुक्क्याने मारहाण केली. हा घडलेला प्रकार अत्यंत लाजिरवाणा आहे. आळंदी पोलीस चौकीत सरकारी कामांमध्ये अडथळा निर्माण केल्याप्रकरणी आरोपी जरे ला अटक करण्यात आले आहे.