नात्याला काळीमा फासणारे कृत्य, दिरानेच महिलेवर शेतात नेऊन केले अत्याचार!

By: Editor_Pratik

On: Thursday, January 30, 2025 7:40 AM

बलात्कार अत्याचार
Google News
Follow Us

पुणे प्रहार डेस्क मानवी जीवनामध्ये नात्यांचे खूप महत्त्व असते. नात्यांच्या आधारे मानवी जीवन समृद्ध होत असते परंतु नाशिक शहरामध्ये घडलेल्या या घटनेमुळे अक्षरशः नातेसंबंधांना काळीमा असलेला आहे. दिरानेच एका महिलेवर अतिप्रसंग केलेला आहे आणि म्हणूनच नाशिक शहरात घडलेल्या घटनेमुळे खळबळजनक वातावरण निर्माण झाले आहे.

घडलेल्या घटनेमध्ये एका वीस वर्षीय महिलेच्या पतीला जामीन मिळवण्याच्या आमिष दाखवून तीन जणांनी अत्याचार केल्याची घटना समोर आलेली आहे. या अत्याचाराच्या घटनेमध्ये महिलेचा नातेवाईक देखील समावेश आहे. ही घटना पंचवटी परिसरातील रामवाडी येथील चौगुले पेट्रोल पंपा जवळ असणाऱ्या एका शेतात घडली आहे. या घटनेमुळे आजूबाजूच्या परिसरात संतापजनक परिस्थिती निर्माण झालेली आहे.

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, एका 20 वर्षीय महिलेने आपल्या पतीला जामीन मिळवण्यासाठी नातेवाईकांची मदत घेतली होती परंतु या मदतीच्या पश्चात तीन जणांनी तिला आमिष दाखवून अत्याचाराला बळी पाडण्यास भाग पडले. या तिघांनी महिलेच्या पतीला जामीन देण्याचे वचन दिले होते व त्यासाठी प्रयत्न करू असे देखील सांगितले होते. या सर्व घटनेमध्ये एक व्यक्ती महिलेचा नातेवाईक म्हणजेच दीर आहे.

तक्रारदार महिला व तिचा पती अल्पवयीन असतानाच त्यांचे एकमेकांवर प्रेम होते परंतु घरच्यांना हे प्रेम संबंध मान्य नसल्याने महिलेच्या माहेरच्या कडील नातेवाईकांनी पतीला एका पोक्सो प्रकरणांमध्ये अडकविले आणि या घटने प्रकरणी महिलेच्या पतीला पोलिसांनी अटक देखील केली.

या घटनेने प्रकरणी तीन जणांनी पतीला जामीन मिळवून देण्याचे आमिष दाखविले आणि नाशिक येथील चौगुले पेट्रोल पंप येथे असणाऱ्या एका शेतामध्ये या तिघांनी तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. घडलेला प्रकार निंदनीय असून या तक्रार महिलांनी पोलिसांमध्ये जाऊन घडलेल्या प्रकार सांगितला l. पोलीस या घटनेचा तपास करीत आहेत.

या घटने प्रकरणी अमित विजय दामले व गोपाल राजेंद्र नागोलकर या दोघांना अटक करण्यात आली असून, पीडित महिलेच्या दिराचा पोलीस शोध घेत आहेत. या गुन्ह्याचा तपास पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी पाटील करीत आहेत.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

March 13, 2026

March 13, 2026

March 13, 2026

March 13, 2026

March 13, 2026

March 13, 2026