मैत्रीच्या नात्याला काळीमा! मैत्रिणीनेच्या मदतीने तरुणीवर तिघांनी केलं असे काही…भयानक कांड!

पुणे प्रहार डेस्क – आत्महत्या, खंडणी, बलात्काराच्या घटना वाढताना दिसत आहेत. अशावेळी एक घटना नव्याने घडलेली आहे. लोक मैत्रीसाठी काहीही करायला तयार होत असतात. मैत्री मानवी जीवनातील अत्यंत महत्त्वाचे नाते आहे. हे नाते विश्वासावर अवलंबून असते परंतु पुण्यामध्ये घडलेल्या या घटनेमुळे मैत्रीच्या नात्याला काळिमा फासलेला आहे. या घटनेमुळे सगळीकडे काळजाला चटका लावणारा प्रसंग घडलेला आहे. पुण्यातील भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत हृदयद्रावक घटना घडलेली आहे.

मैत्रिणीच्या मदतीनेच एका तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना नोंदवली गेली आहे. तरुणीच्या मैत्रिणीने स्वतच्या घरी बोलावले त्यानंतर तुला इथे मित्रांसोबत थांबावे लागेल.. नाहीतर आम्ही तुला जिवे मारू अशी धमकी दिली. त्यानंतर तिच्यावर तिघांनी आळीपाळीने बलात्कार केल्याचा प्रकार घडलेला आहे. ही घटना 3 जानेवारी रोजी घडली. या घटने अंतर्गत भारतीय विद्यापीठ पोलिसांनी मैत्रिणी सोबतच दोघांना अटक देखील केली आहे.

भरत रोहिदास गव्हाणे आणि सुनोमो भरत गव्हाणे ऊर्फ सुमोना नूर इस्लाम शेख अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रार केलेल्या तरुणीला मैत्रिणीच्या घरी बोलावले गेले आणि त्यानंतर येथेच थांबायला सांगितले. जर तिघांसोबत या तरुणीने शारीरिक संबंध ठेवले नाही तर जिवे मारण्याची धमकी दिली व त्याचबरोबर आरडाओरड केल्यावर आताच्या आता जीव घेऊ असे सांगितल्यामुळे या तरुणीवर वेगळीच परिस्थिती उद्भवली. त्यानंतर दोघांनी या तरुणीवर आळीपाळीने शारीरिक संबंध ठेवून तिच्यावर बलात्कार केला.

घाबरलेल्या या तरुणीने त्वरितच भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आणि घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी त्वरितच तिच्या मैत्रिणीला अटक केले असून दोन आरोपींचा पोलीस शोध घेत आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक स्नेहल थोरात करत आहेत. लवकरच या दोन्ही आरोपींचा शोध घेतला जाईल. अतिप्रसंग, बलात्कार करण्याच्या घटने अंतर्गत योग्य ती कारवाई केली जाईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले.