चिन्मय कृष्णदास यांच्या अन्याय्य अटकेच्या निषेधार्थ हिंदु राष्ट्र समन्वय समितीकडून आंदोलन !  

चिन्मय कृष्णदास यांच्या सुटकेसाठी, तसेच बांगलादेशी हिंदूंच्या रक्षणासाठी भारत सरकारने हस्तक्षेप करावा !

 पुणे – बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांच्या संरक्षणासाठी कायदेशीर मार्गाने आंदोलन करणाऱ्या बांगलादेशातील इस्कॉनचे प्रमुख स्वामी चिन्मय कृष्णदास ब्रह्मचारी यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अन्याय्य अटक करण्यात आली आहे. ही अटक म्हणजे हिंदू अल्पसंख्याकांचे हक्क दडपण्याचा आणखी एक प्रकार आहे, याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. भारत सरकारने तातडीने पावले उचलून चिन्मय कृष्णदास ब्रह्मचारी यांची विनाअट सुटका व्हावी आणि हिंदू अल्पसंख्याकांच्या संरक्षणासाठी तेथील सरकारला भाग पाडावे, अशी मागणी हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या माध्यमातून करण्यात आलेल्या आंदोलनात करण्यात आली. 1 डिसेंबर या दिवशी सायंकाळी 4 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ, ससाणे नगर, हडपसर या ठिकाणी या संदर्भातील आंदोलन करण्यात आले. यावेळी विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी या घटनेवर निषेध व्यक्त केला आणि शासनाने यावर कारवाई करावी अशी मागणी केली.

या ठिकाणी झालेल्या आंदोलनात स्वातंत्र्यवीर सावरकर युवा विचार मंचाचे अध्यक्ष डॉ. श्री. नीलेश लोणकर, हिंदु जनजागृती समितीचे पराग गोखले, हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे श्री सचिन घुले, श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान पुणेचे  अध्यक्ष श्री मुकुंद मासाळ, मेजर सुधिरचंद्र जगताप, श्रीराम मंदिर ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष श्री संदीप अप्पा राऊत, भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा पुणेच्या सरचिटणीस सौ उज्वला जितेंद्र गौड, परिवर्तन महिला आधार केंद्राच्या संस्थापक अध्यक्ष सौ. शोभा लगड, रुद्रतेज प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री अमित गायकवाड, ह.भ.प. दत्तात्रय महाराज चोरघे आदींनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी 200 हून अधिक धर्मप्रेमी उपस्थित होते.

       भारत सरकारने हस्तक्षेप करून 1971 प्रमाणे कारवाई करायला हवी. हिंदूंवरील हे अत्याचार रोखण्यासाठी भारताने सैनिकी कारवाई करायला हवी असे परखड मत स्वातंत्र्यवीर सावरकर युवा विचार मंचाचे अध्यक्ष डॉ. श्री. नीलेश लोणकर यांनी व्यक्त केले. सर्व हिंदू बांधवांनी एकत्र येणे गरजेचे आहे आणि हिंदूंच्या समस्यांवर सरकारकडे मागणी केली पाहिजे असे शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे मुकुंद मासाळ यांनी सांगितले. सर्व हिंदूंनी एकत्र येऊन भारत सरकारवर दबाव टाकून चिन्मय स्वामी यांना सोडण्यासाठी प्रयत्न करायला हवा असे संदीप अप्पा राऊत म्हणाले. प्रत्येक हिंदूंच्या घरात एक तरी शस्त्र असायले हवे ते दुसऱ्यांवर वापरण्यासाठी नाही तर स्वतःचे रक्षण करण्यासाठी असे अमित गायकवाड यांनी सांगितले. बांगलादेशातील हिंदूंची सध्या अशी अवस्था आहे की ते घरातून बाहेरही निघू शकत नाही घरातही असुरक्षितता आहे. हिंदू महिलांवर घरात जाऊन अत्याचार केले जात आहे.त्यासाठी भारतातील हिंदूंनी या विरोधात संघटित होऊन आवाज उठवावा असे आवाहन ह.भ.प. दत्तात्रय महाराज चोरघे यांनी केले. लवकरात लवकर चिन्मय स्वामी यांची सुटका करण्यासाठी बांगलादेशी सरकारवर दबाव टाकण्यात यावा अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे पराग गोखले यांनी केली. सौ. गौड यांनी आंदोलन चालू असताना येणाऱ्या जाणाऱ्या हिंदूंना आंदोलनामध्ये सहभागी होण्याचे आव्हान केले. जे हिंदू आंदोलनात सहभागी होऊ शकत नाही त्यांनी किमान थांबून आंदोलनामध्ये जे हातात फलक पकडलेले आहेत ते तरी वाचुयात आणि आपले धर्म कर्तव्य बजाऊया असे सौ. गौड यांनी सांगितले.

   हिंदूंवरील हे अत्याचार रोखले नाही, तर त्याचे लोण भारतात येण्यास वेळ लागणार नाही; म्हणून हिंदूंना भारत सरकारकडून कठोर भूमिका आणि निर्णायक पावले उचलण्याची अपेक्षाही समितीने व्यक्त केली आहे.