शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार आमदार अशोक पवार यांच्या गाव भेट दौऱ्यानिमित्त लोणी काळभोर येथे पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी विरोधकांवर जबरदस्त हल्लाबोल करून वातावरणात बदल घडवून आणला .
आज महाराष्ट्र अडचणीत आहे महाराष्ट्र कर्जबाजारी झाला आहे महाराष्ट्र बेरोजगारी प्रचंड वाढली महागाई वाढली आहे.
माझ्या लोणी काळभोर मधील तरुण मित्र ज्येष्ठ बांधव , माता ,बहिणींना आणि भावांनो येणाऱ्या २०तारखेला मतदान आपण करणार आहात पुढच्या बारा दिवसानंतर या मतदानाला आपण जाण्यापूर्वी आपल्याला विचार करायचा आहे आज महाराष्ट्र मध्ये काय चाललंय शिव शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये राजकारणाचा चिखल झालेला आहे. चांगल्या माणसांनी राजकारणात यावं कि नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे कधी नवी अशा पद्धतीचे गलिच्छ पद्धतीचं राजकारण या महाराष्ट्रात सुरू आहे.
मित्रांनो मराठी माणसाचे दोन पक्ष या महाराष्ट्रात होतायेत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेला शिवसेना पक्ष हायात असताना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना पक्षाची सूत्रेउद्धव ठाकरे यांच्या हातात दिलेली आहेत त्याचबरोबर महाराष्ट्राचे पालक म्हणून आयुष्यभर काम करताना पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर सुद्धा दरोडा टाकला आहे.
बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेवर दरोडा टाकला पवार साहेबांच्या राष्ट्रवादीवर तर टाकला .
अशोक पवार यांना का साथ द्यायची कारण एवढी संकटे येऊन सुद्धा पवार साहेबांची साथ सोडलेली नाहीये पवार साहेबांच्या बरोबर एकनिष्ठ राहुन शिरुर हवेलीत अनेक विकास कामे केली आहेत . आपल्या भागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आपले आमदार अशोक पवार दोघही पवार साहेबांच्या बरोबर ठाम राहिलेले आहेत .
यशवंत सहकारी साखर कारखान्यात चालू करताना कारखान्याची १०० एकर जमीन मार्केट कमिटीला देणार असल्याचे विरोधक सांगत आहेत . जमीन सभासदांच्या मालकीची व पैसा मार्केट कमिटीचा मग तुमचे योगदान याच्यात काय ते सांगा आईजीच्या जिवावर बाईजी उदार अशी गत तुमची झाली आहे .
आपण आपल्या माता भगिनींना सांगा आपल्या भावकीतल्या लोकांना सांगा नातेवाईकांना सांगा की मशीनवर मतदानाला गेल्यानंतर पहिल्या क्रमांकाला तुतारी वाजवणारा माणसाच्या पुढचं बटन दाबायच आहे म्हणजे आपण भावी मंत्र्याला निवडून देणार आहात.
आता महाविकास आघाडीचे सरकार आल्याशिवाय राहणार नाही आघाडीचे सरकार आल्यानंतर मंत्रिमंडळाच्या शपथविधी होत असताना अशोक पवार यांचा त्या ठिकाणी पहिल्या तीन मध्ये नंबर लागणार आहे .
यावेळी मतदारांनी या गाव भेट दौऱ्याला प्रचंड गर्दी केली होती.