शिरूर विधासभेत राजकीय पटलावर गुलाबी हवा… जनतेला हवा आमदार नवा….माऊली मय वातावरणात …तरुणाई जल्लोषात…

शिरूर १९८ विधानसभा मतदार संघात राजकीय पटलावर मोठी घडामोड घडत असून ऐन हिवाळ्यात राजकारण चांगलेच तापले आहे . महिला भगिनी,युवकांचा व वृद्धांचा मिळणारा मोठा पाठिंबा पाहता प्रस्थापितांच्या मनात धडकी भरवणारा व परिवर्तन घडवणाऱ्या राजकीय पटलावरील गुलाबी हवेने चांगलाच जम बसवला आहे .

महाविकास आघाडी आणि महायुतीला शिरूर हवेली मतदारसंघात मिळणाऱ्या प्रतिसादाचे अवलोकन केले असता, महायुतीने यात मोठी आघाडी घेतल्याचे चित्र आहे.नवीन आमदार हवा म्हणजेच आता बदल हवा अशा स्वरूपाचा सुर सर्वत्रच पहावयास मिळत असून लाडक्या बहिणींच्या आशीर्वादाने व तरुणाच्या आणि थोरामोठ्यांच्या आशीर्वादाने आपला माणूस श्रावणबाळ माऊली कटके यांना मिळणारा पाठिंबा व उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता शिरूर हवेलीत नवीन पर्याय आवडलेला व पसंतीला उतरलेला दिसत असून परिवर्तन अटळ व ठरलेले असून जनतेला हवाय आमदार नवा असे विश्वसनीय चित्र निर्माण झाले आहे.

शिरूर हवेली मतदारसंघातील आजची परिस्थिती पाहता, सगळीकडे महायुतीचे उमेदवार माऊली कटके यांचा डंका वाजताना दिसत आहे.विद्यमान आमदाराला त्यांच्या पक्षाने तीन वेळा संधी दिली यात ते एक वेळा अपयशी दोन वेळा विजयी ठरले आहेत.एकूणच जेवढी संधी त्यांना मिळायला हवी तेवढी त्यांना मिळाली असल्याने कितीवेळा संधी द्यायची,रावसाहेब दादा घोडगंगा सहकारी साखर कारखाना बंद पडला असला तरी त्याचे चेअरमनपद आहे , त्यांच्याकडे खासगी कारखाना आहे.

जिल्हा बँकेचे संचालकपदही त्यांच्याकडे आहे.त्यांच्याच घरात जिल्हा परिषद आहे एकच घरात इतकी पदे द्यायचे आता पुरे झाल यांचं आता नवीन चेहऱ्याला संधी मिळायलाच हवी असा मतदारांचा सुर असून माऊली कटके यांच्याकडे मतदारांचा विश्वसनीय कल आहे.यामुळे तरुणांना संधी या दृष्टिकोनातून नवीन व्यक्तीला संधी मिळायला हवी असाही सूर आहे.

या आधीच्या चार पंचवार्षिक निवडणुकांमध्ये गावागावात उमेदवार आल्यानंतर मोठ्या प्रमाणावर महिला कधीच समोर येताना दिसल्या नाहीत.या वेळी मात्र कटके जिथे जात आहेत तिथे महिलांची संख्या लक्षणीय दिसत आहे.कदाचित हा लाडकी बहीण योजनेचा परिणाम , उज्जैन महाकाल यात्रेचे पुण्य, महायुतीची वळलेली वज्रमूठ यांच्यासह सर्व घटक एकजीवने कार्यरत आहे.

शिरूर विधानसभेची ही निवडणूक सर्वसामान्य जनतेनेच हातात घेतल्याचे चित्र जाणवत आहे.कटके यांना शिरूर आणि हवेली या दोन्ही भागातून प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे. जनता जनार्दन भावनिक होत आहे.

शिरूर हवेली मतदार संघाची एकूण मतदारसंख्या चार लाख ५९ हजार ६९३ (यात वाढ झाली असावी) इतकी आहे.यात २ लाख २० हजार ५४२ महिला मतदार तर २ लाख ३८ हजार ८७४ पुरुष मतदार व इतर १३ मतदार आहेत.

मागील काही निवडणुकांचा अनुभव पाहता,महिला मतदारांचा मतदान करण्याचा टक्का पुरुषांपेक्षा कमी राहिलेला दिसतो.यावेळी मात्र महिला मतदानास फार उत्सुक असल्याचे जाणवते. महिलांच्या मतदानाचा टक्का वाढणार असून लाडक्या बहिणी भाऊ रायाच्या विजयात मोलाचे दान टाकण्यासाठी सरसावल्या असून महायुतीच्या विजयात मोलाचं वाटा उचलणार आहे. नव्याने नोंद झालेल्या या युवा मतदारांनी उत्स्फूर्त भरघोस मतदान करणार असून याचा कटके यांना विजयासह मोठे लीड देण्यात फायदा मिळू शकतो.एकूणच शिरूर हवेली मतदार संघात बदलाचे वारे वाहू लागल्याचे वास्तव दिसून येत आहे.

शिरूर हवेलीतील लाडकी बहिण, तरुणाई, माता भगिनी, उज्जैन यात्रा यांचा गावोगावी मिळणारा उदंड प्रतिसाद व हृदयातील आशीर्वाद माऊली कटके यांच्या विजयासाठी एकवटलेले असंख्य हात आता विजयाचा गुलाल उधळणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.