सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ८१ ठिकाणी; तर पुणे जिल्ह्यात ८ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन !‘

By: Editor _2

On: Monday, July 27, 2026 6:42 PM

Google News
Follow Us

राष्ट्र-धर्म रक्षणाचे कार्य करण्यासाठी महोत्सवात सहभागी व्हा! – सनातन संस्थेचे आवाहन

पुणे – ‘अमेरिका-इराण युद्धा’ ची झळ भारतियांना अल्पाधिक प्रमाणात बसत आहे. भारतातील आतंकवाद, नक्षलवाद, ‘लव्ह जिहाद’, ‘लँड जिहाद’, धर्मांतर, गोहत्या आदी समस्यांत ‘कार्पोरेट जिहाद’, ‘जैविक जिहाद’ यांसम नव्या संकटांची भर पडली आहे. सामान्य व्यक्तीला वरीलपैकी कोणत्याही संकटाला सामोरे जावे लागू शकते. अशा संकटसमयी काय करावे, याचे उत्तर भारताचे अद्वितीयत्व असलेल्या गुरु-शिष्य परंपरेने आधीच देऊन ठेवले आहे. ते समाजापर्यंत पोचवावे, यासाठी सनातन संस्था यंदाचा ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ हा ‘रामराज्याच्या निर्मितीची दिशा स्पष्ट करणारा उत्सव म्हणून साजरा करत आहे. हा उत्सव बुधवार, २९ जुलै या दिवशी होत आहे. यंदा हा महोत्सव मराठी, हिंदी, गुजराती, कन्नड, तेलुगु, मल्याळम् आदी विविध भाषांमध्ये देशभरात ८१ ठिकाणी, तर संपूर्ण पुणे जिल्ह्यात ८ ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे.

या महोत्सवात श्री व्यासपूजन आणि प.पू. भक्तराज महाराज यांचे प्रतिमापूजन (गुरुपूजन), सनातन संस्था आणि संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे कार्य यावर लघुपट, धर्मरक्षक आणि हिंदुनिष्ठ यांचे सत्कार, राष्ट्रभक्त अन् धर्मनिष्ठ मान्यवरांचे मार्गदर्शन, स्वसंरक्षणाच्या सोप्या पद्धतींची प्रात्यक्षिके, रामराज्याच्या स्थापनेसाठीचा संकल्प आणि नामजप, तसेच ‘रामराज्य अर्थात हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठीचा संघर्ष आणि दिशा’ या विषयांवरही मान्यवर वक्त्यांचे विशेष मार्गदर्शन होणार आहे. या महोत्सवात ग्रंथप्रदर्शन, तसेच राष्ट्र-धर्म विषयक फलकप्रदर्शनही लावण्यात येणार आहे. तरी सर्वांनी या अमूल्य पर्वणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेने केले आहे.

ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सव’ : देश-विदेशांतील भाविकांना गुरुपौर्णिमेचा लाभ घेता यावा यासाठी सनातन संस्थेच्या वतीने मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, कन्नड, मल्याळम् या भाषांत ‘ऑनलाईन गुरुपौर्णिमा महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. २९ जुलैला मराठी /हिंदी भाषेतील ‘गुरुपौर्णिमा महोत्सवा’चा लाभ पुढील मार्गीकेवर (लिंकवरून) घेता येईल. https://www.sanatan.org/mr/gurupurnima

मराठी यूट्यूब चैनल: YouTube.com/@SSMarathi
वेळ – संध्या. ५.३०

हिंदी यूट्यूब चैनल: YouTube.com/@SanatanSanstha
वेळ – संध्या. ६.००

स्थानिक गुरुपौर्णिमेचे पत्ते व वेळा :
१. सिद्धार्थ हॉल, माणिकबाग, फुलपरी स्वीट गल्ली, सिंहगड रस्ता, पुणे.
वेळ : सायं. ५.३० वा.

२. श्री हनुमान मंदिर सेवा ट्रस्ट, (श्री हनुमान मंदिर शेजारील हॉल), तुकाईदर्शन, काळेपडळ, हडपसर, पुणे.
वेळ : सायं. ५.३० वा.

३. ११/१ विणकर सभागृह, निर्मल पार्क शेजारी, चव्हाण नगर, पुणे.
वेळ : सायं. ६ वा.

४. १२३६ श्रुति मंगल कार्यालय, आपटे रोड, डेक्कन जिमखाना,पुणे.
वेळ : सायं. ६ वा.

५. रामबाग हॉल, सरकारी दवाखान्यासमोर, भोर, पुणे.
वेळ : सायं. ६ वा.

६. जी. एम. के. बँक्वेट्स अँड लॉन्स रावेत, कात्रज देहूरोड बायपास, रावेत, पुणे.
वेळ : सायं. ५.३० वाजता

७. प्लॉट क्रं. २८९/२९०, हॉटेल सात्विक रूट्स, मावळ ग्रँड हॉटेल समोर, मनोहर नगर, तळेगाव दाभाडे, पुणे.
वेळ : सायं. ५.३० वा.

.८ श्री तुळजाभवानी सभागृह, तिळवण तेली समाज कार्यालय, तेली बुधवार पेठ, ता. जुन्नर, जिल्हा पुणे.
*  वेळ सायं. ५.३० वा.
For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

August 14, 2026

August 14, 2026

August 13, 2026

August 13, 2026

August 13, 2026

August 11, 2026