माऊली कटके यांचा विजय निश्चित – प्रदिप कंद

By: Editor_Manas

On: Thursday, November 7, 2024 12:47 PM

Google News
Follow Us

लोणी काळभोर : महायुती सरकारने राज्यात अनेक कामे करून विकासकामांची गंगा आणली आहे. त्यामुळे शिरूर हवेली विधानसभा मतदार संघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके विजय निश्चित असल्याचे मत पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व पिडीसी बँकेचे संचालक प्रदीप कंद यांनी व्यक्त केले.

शिरूर हवेली विधानसभा मतदार संघात प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर कटके यांचे कुंजीरवाडी (ता. हवेली) चौकात फुलांची उधळण, फटाक्यांची आतिषबाजी व ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. यावेळी कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील हनुमान मंदिराजवळ एक छोटेखानी सभा झाली. यावेळी बोलताना वरील प्रतिपादन प्रदीप कंद यांनी केले आहे.

यावेळी बोलताना प्रदीप कंद म्हणाले की, शिरूर हवेली तालुक्यातून तुम्हा दोघांपैकी एक उभा राहा. अशी जनता वारंवार सांगत होती. त्यातच पक्षाचे आदेश आल्याने निवडणुकीतून माघार घेतली आहे. आणि संयम आणि समजूतदारपणे मोठ्या भावाची भूमिका बजावून माऊलींना पाठींबा दिला आहे. तुम्ही विकासकामांची चिंता करायची सोडून द्या. याची सर्व जबाबदारी आमच्या सगळ्यांची आहे. तुम्ही फक्त सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा ज्ञानेश्वर कटके यांच्या समोरील घड्याळ्याचे बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करा. असे आवाहन प्रदीप कंद यांनी यावेळी केली आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now