लोणी काळभोर प्रतिनिधी – शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार माऊली कटके यांच्या प्रचाराचा नारळ थेऊर येथील चिंतामणीचे दर्शन घेऊन फोडण्यात आला. यावेळी सभेत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद बोलताना सांगितले की जिल्हा नियोजन समितीतून कोट्यवधीचा निधी महायुती सरकारच्या काळात आणुन गावातील अनेक विकासकामे मार्गी लावली.
माऊली आबा सारखा तरुण कार्यकर्ता तरुण सहकारी या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास कसा होईल हा नेहमी प्रयत्न करील. शिरुर हवेली मतदारसंघाला पुढे घेऊन जाईल. कही खुशी कभी गम असे वातावरणाला मला दोन-तीन दिवस सामोरे जावे लागले काहीनी आम्हाला सांगितले की तुम्ही असं करा तर काही नी सांगितलं तुम्ही निवडणूक लढवा नेत्यांनी सांगितले की निवडणूक लढू नका तुम्हाला एवढे खात्रीपूर्वक सांगतो. मी माझ्या राजकीय जीवनामध्ये कधीही डुप्लिकेट राजकारण केलं नाही. माझ्या सगळ्या सहकार्याने सुद्धा कुठेही तशा पद्धतीचे राजकारण केलं नाही.
एक विचारांनी गांभीर्याने निवडणुकीला सामोरे जाणे ही काळाची गरज आहे निवडणूक सहज घेऊ नका मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो हवेली तालुक्यातील गावे एकत्र येतील आणि माऊली कटकेच्या मागे ठाम उभे राहतील. यशवंत सहकारी साखर कारखान्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे कारखान्याचे संचालक मंडळ सहा महिने कारखाना सुरू करण्याचा प्रयत्न करत आहे १६० कोटी रुपये कर्ज आहे परंतू संचालक मंडळाने स्वतःचे पैसे गोळा करून बँकेची जप्ती कशी कमी होईल यासाठी प्रयत्न केले.
महायुतीचे सरकार राज्यात आल्यास कारखाना मोठ्या जोमाने सुरू होण्यासाठी मदत होईल. इतक्या वर्षानंतर पुन्हा एकदा आपल्याला विधानसभेची उमेदवारी मिळाली त्यामुळे महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागून गावातील गटतट बाजूला ठेवून एकदिलाने महायुतीचाउमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून देण्यासाठी प्रत्येकाने कामाला लागलं पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट भाजप शिवसेना शिंदे गट या महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर कटके यांच्या विजयासाठी एकवटले असून विजय निश्चित असल्याचा विश्वास सुरेश घुले यांनी दिला .प्रचाराला सुरुवात करताना प्रचंड गर्दी पहायला मिळाली .