Lonikalbhor : विधानसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज संपली. त्यामध्ये शिरूर विधानसभा मतदारसंघात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व भारतीय जनता पार्टीचे नेते प्रदीप कंद यांनी अखेर विधानसभा २०२४ ला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघात मतदारांना रंगतदार लढत पाहायला मिळणार आहे.
शिरुर हवेलीच्या मैदानात भाजपचे उमेदवार प्रदिप कंद यांनी तिस-यांदा माघार घेत असलेले दिसून आले आहे. शिरूर विधानसभा मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पार्टी कडून प्रदीप कंद हे उमेदवारीच्या रेस मध्ये होते परंतु ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाकडे गेल्याने प्रदीप कंद यांची निराशा झाली होती.
म्हणून त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. हा उमेदवारी अर्ज कायम राहील अशी चर्चा शिरूर विधानसभा मतदारसंघांमध्ये होती. कारण या विधानसभेवर मोठ्या प्रमाणात राजकीय गणित अवलंबून होती व शिरूर हवेलीचा दावेदार कोण? याकडेही लक्ष लागले होते.
प्रदीप कंद हे एकमेव असे उमेदवार होते की तो अपक्ष उभे राहून निवडणुकीत चुरस आणू शकले असते परंतुराज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या आदेशानंतर त्यांनी
उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.
भाजपा वरिष्ठांनी शिरूर हवेलीतील भाजप कार्यकर्त्यांच्या पाठीमागे ताकद उभे करण्याच्या बद्दल शब्द दिला आहे. व महायुतीमध्ये कुठलीही गटबाजी नको यामुळे वरिष्ठाच्या सांगण्यावरून मी माझा उमेदवारी अर्ज पाठीमागे घेत असुन महायुतीचे उमेदवार माऊली कटके यांचा प्रचार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रदिप कंद यांनी माघार घेतल्यामुळे महायुतीला भक्कम साथ मिळणार असुन महायुतीत आंनदाचे वातावरण तयार झाले आहे.
माऊली कटके यांच्या प्रचारात तरुणाई उतरले असून दिवसेंदिवस त्यांना वाढता पाठिंबा मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अशोक पवार व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माऊली कटके यांच्यामध्ये ही लढत होणार असून या लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष लागून लक्ष लागले आहे.