घोडगंगा सहकारी साखर कारखाना हा आमदार अशोक पवार यांच्या मुळे बंद पडल्याचा आरोप दादा पाटील फराटे यांनी केला .हा साखर कारखाना शेतकऱ्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न असल्याने सर्व राजकारण सध्या या साखर कारखान्याच्या प्रश्नांवर फिरत आहे.विद्यमान आमदार यांच्या मते मी सत्तेत नसल्याने कारखाना बंद पडला आहे.
याला प्रतिउत्तर देताना दादा पाटील फराटे म्हणाले की अशोक पवार सत्तेत असताना घोडगंगा साखर कारखाना बंद झाला आहे २५ वर्ष एक हाती सत्ता असताना घोडगंगा सहकारी साखर कारखाना बंद झाला आहे.
त्याच्यामुळे मी सत्तेत नाही म्हणून मी बाजूला गेलो हे सांगण्यात काय बरोबर नाही 25 वर्षे एक हाती सत्ता असताना देखील साखर कारखाना तोट्यात का गेला याचे उत्तर त्यांनी अगोदर दिले पाहिजे आणि सत्तेत असतानाच कारखाना बंद झालाय आठ वर्षापूर्वी साखर कारखान्याला ग्रहण लागले आठ वर्षांपूर्वी साखर कारखान्याचे दोन महिन्यांचे पागर थकायला सुरुवात झाली त्याच्यामुळे दादांवर ठपका ठेऊ नये.
दादांनी त्यांना खऱ्या अर्थाने अशोक पवार यांना मदत केली होती.परंतु आता निवडणूक समोर आल्याने बोलायला काहीच नाही म्हणून काहीही बोलले जात आहे.