आमदार अशोक पवार यांच्या मागे शिवसेना ठामपणे उभा राहणार – स्वप्नील कुंजीर

By: Editor_Pratik

On: Monday, November 4, 2024 3:09 AM

स्वप्नील कुंजीर
Google News
Follow Us

लोणी काळभोर प्रतिनिधी – शिरूर हवेली मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार अशोक पवार यांच्या मागे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष ठामपणे उभा राहणार असून हवेली तालुक्यात आमदार अशोक पवार यांना जास्त मतदान कसे होईल याकडे शिवसेना जातीने लक्ष देणार असल्याचे मत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिरूर हवेली संघटक स्वप्नील कुंजीर यांनी सांगितले.

स्वप्निल कुंजिर यांच्या वतीने शिवसैनिकासाठी आयोजित दिवाळी फराळ कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून आमदार अशोक पवार उपस्थित होते. यावेळी शिवसेना हवेली तालुका प्रमुख युवराज दळवी , महिला आघाडी तालुका प्रमुख छायाताई महाडिक , संघटीका उर्मिलाताई भुजबळ ,तालुका संघटक गणेश धुमाळ , वाहतूक सेना तालुका अध्यक्ष बाळासाहेब भोंडवे ,उपाध्यक्ष तानाजी जाधव , संघटक विष्णु नरके , शिवसेना विभागप्रमुख अजय मोरे, संतोष खेंगरे ,शाहजी बनकर , उपविभागप्रमुख शिवाजी ढवळे , किरण थेऊरकर , युवासेना हवेली सरचिटणीस हेमंत कोळपे , सागर कदम ,युवासेना विभागप्रमुख चंद्रकांत कुंजीर, उपशाखा प्रमुख संतोष कुंजीर ,काकासाहेब क्षीरसागर , दत्ताभाऊ अडसुळे , अभिराम काळभोर ,गणेश काळभोर ,उमेश ढमाले, पृथ्वीराज कुंजीर ,भाऊसाहेब महाडिक शरद कोलते यांच्या सहशेकडो पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी उपस्थित सर्व शिवसैनिकांनी आमदार अशोक पवार यांचे निष्ठेने प्रामाणिक काम करण्याचे वचन दिले. अशोक पवार यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की मी पवार साहेबांच्या पक्षात असल्यामुळे माझ्या फाईल अडवल्या मला त्यांनी आठ घातली की तुम्ही आमच्या पक्षात या मी तुम्हाला १६० कोटी कर्ज देतो मी त्यांना सांगितलं की आदरणीय पवार साहेब माझ्या हृदयात आहेत काहीही झाले तरी मी पवार साहेबांना सोडणार नाही व पवार साहेबांशी गद्दारी करणार नाही .

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

September 24, 2026

September 23, 2026

September 22, 2026

September 20, 2026

September 15, 2026

September 12, 2026