सनातन संस्थेचा अभिनव उपक्रम !

By: Editor _2

On: Thursday, November 21, 2024 5:04 PM

Google News
Follow Us

पुणे येथील विश्वशांतीनिकेतन विद्यालयाच्या कुरुळी शाखेमध्ये पालकांसाठी व्याख्यानाचे आयोजन! 

सनातन संस्थेच्या वतीने ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्माचे महत्त्व’ याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन !

 

पुणे – विश्वशांतीनिकेतन विद्यालयाच्या कुरुळी शाखेमध्ये पालकांसाठी 16 नोव्हेंबर या दिवशी प्रथम सत्र परीक्षेच्या ‘ओपन डे’ च्या निमित्ताने पालकांसाठी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सौ. जयश्री काळे यांनी ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्माचे महत्त्व’ याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी बहुसंख्येने महिला उपस्थित होत्या. तसेच विविध प्रश्न विचारून त्यांनी आपल्या शंकांचे निरसन करून घेतले.
    सौ. जयश्री काळे यांनी सांगितले की, सध्या बहुतेकांचे दैनंदिन जीवन हे धावपळ आणि चिंता यांनी ग्रासलेले आहे. मनःशांती हरवली आहे. ताणतणाव हा तर आयुष्याचाच एक भाग झाला आहे. शाळेत जाणारे अगदी लहान मूल असू दे किंवा कुणी वयोवृद्ध असू दे, आज जवळपास प्रत्येकालाच दैनंदिन जीवनात ताण तणावाचा  सामना करावा लागतो. आपण शिक्षण घेतांना इतिहास, भूगोल, गणित असे अनेक विषय शिकतो; पण आपल्याला आनंद कसा मिळवायचा ?, हे कुठेच शिकवले जात नाही. हे सर्व साधनेने शक्य होत असून या सगळ्या परिस्थितीवर मात करण्यासाठी साधनाच करायला हवी. आत्मसुख प्राप्त करून देणारी गोष्ट म्हणजे अध्यात्म !
    हा कार्यक्रम खूपच चांगला होता. मार्गदर्शना नुसार कृती करण्याचा प्रयत्न करणार असे मत काहींनी व्यक्त केले.
For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now