आघाडीची टेलिकॉम कंपनी वोडाफोन आयडिया लिमिटेडचा एंटरप्राइज विभाग, वी बिझनेसने इन्फिनिटी लॅब्स लिमिटेडसोबत भागीदारी केल्याची घोषणा केली आहे. हायब्रिड एसडी–वॅन पोर्टफोलिओचा एक भाग म्हणून मेक–इन–इंडिया एसडी–वॅन सादर करण्यासाठी ही भागीदारी करण्यात आली आहे. प्रगत एआयवर आधारित सुरक्षा वैशिष्ट्ये एकत्रित करून या भागीदारीने हा पोर्टफोलिओ अधिक उन्नत केला आहे, आणि भारतीय व्यवसायांना सायबर हल्ल्यांच्या वाढत्या धोक्यांविरोधात मजबूत सुरक्षा प्रदान केली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रदान करून नावीन्याला प्रोत्साहन देण्याची वी बिझनेसची वचनबद्धता यातून दिसून येते.
डिजिटल व्यवसाय वातावरणामध्ये उत्कर्ष करण्यासाठी कोणत्याही व्यवसायासाठी मजबूत सुरक्षा संरचना असणे महत्त्वाचे असते. हायब्रिड एसडी-वॅन हे व्यवसायांना हायब्रिड नेटवर्क, एकीकृत सुरक्षा, इंटेलिजंट राऊंटिंग, मॉनिटरिंग आणि अनालिटिक्स यासारखी सोल्युशन्स पुरवण्यासाठी डिझाईन करण्यात आले आहे.
इन्फिनिटी लॅब्स लिमिटेडसोबत भागीदारी वी बिझनेस हायब्रिड एसडी–वॅन वापरणाऱ्या व्यवसायांना एआय–पॉवर्ड सुरक्षा वैशिष्ट्ये प्रदान करून सक्षम बनवेल आणि त्यांच्या धोका ओळखण्याच्या यंत्रणा मजबूत बनवेल, रिस्पॉन्सेसना स्वयंचलित करेल आणि संवेदनशील माहितीला अधिक प्रभावीपणे सुरक्षित ठेवेल.
वी बिझनेसचे ईव्हीपी श्री रोचक कपूर यांनी सांगितले, “इन्फिनिटी लॅब्स लिमिटेडसोबतच्या या भागीदारीमुळे आम्ही देशात विकसित करण्यात आलेले एसडी–वॅन सोल्युशन्स प्रदान करू शकू, त्यामुळे व्यवसायांना उन्नत सुरक्षा क्षमता मिळतील व भविष्यातील उत्क्रांतीसाठी मोठा रोडमॅप तयार करता येईल. ही भागीदारी तंत्रज्ञानाविषयी आणि मेक इन इंडिया पायाभूत सोयीसुविधांविषयी आहे ज्या भारतीय व्यवसायांना सुरक्षित कनेक्टिव्हिटी मिळवून देतील जी सध्याच्या डिजिटल वातावरणामध्ये पुढे जाण्यासाठी आवश्यक आहे.”
इन्फिनिटी लॅब्स लिमिटेडचे सीईओ आणि एमडी श्री राकेश गोयल यांनी सांगितले, “या महत्त्वपूर्ण कामासाठी वी बिझनेससोबत भागीदारी करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. ही धोरणात्मक भागीदारी आधुनिक एआयवर आधारित नेटवर्क सुविधा पुरवण्याच्या आमच्या मिशनमध्ये एक महत्त्वाचे पुढचे पाऊल आहे. आम्ही एकत्र मिळून भारतीय व्यवसायांना एआयवर आधारित सुरक्षित एसडी–वॅन सुविधा प्रदान करू ज्यामुळे त्यांच्या वाढत्या व्यवसाय गरजा पूर्ण होतील आणि महत्त्वाचे म्हणजे हे स्थानिक पातळीवर विकसित करण्यात आले आहे.”