टाटा टेक्नॉलॉजीज आणि बीएमडब्ल्यू ग्रुपने बीएमडब्ल्यू टेकवर्क्स इंडियाची स्थापना केली – हा भागीदारी उद्यम ऑटोमोटिव्ह सॉफ्टवेयर आणि बिझनेस आयटी इनोव्हेशनला चालना देईल

 

  • हा भागीदारी उद्योग ऑटोमोटिव्ह सॉफ्टवेयरमध्ये नावीन्य आणेल, यामध्ये बिझनेस आयटीसाठी सॉफ्टवेयरडिफाइन्ड वेहिकल्स (SDV) आणि डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन सोल्युशन्स यांचा समावेश आहे.
  • स्ट्रॅटेजिक इंडियन टॅलेंट सेंटर्सपुणे, बंगलोर आणि चेन्नईबीएमडब्ल्यू ग्रुपच्या सॉफ्टवेयर आणि आयटी हबच्या जागतिक नेटवर्कचा भाग बनतील.
  • २०२५ च्या अखेरपर्यंत कर्मचाऱ्यांच्या संख्येत चारअंकी वाढ करण्याची योजना आहे.

 

उत्पादन अभियांत्रिकी आणि डिजिटल सेवा प्रदान करणारी जागतिक कंपनी, टाटा टेक्नॉलॉजीज आणि जगातील आघाडीच्या प्रीमियम ऑटोमोटिव्ह उत्पादकांपैकी एक, बीएमडब्ल्यू ग्रुपने मिळून बीएमडब्ल्यू टेकवर्क्स इंडिया हा भागीदारी व्यवसाय सुरु केल्याची अधिकृत घोषणा केली आहे. करारांवर अंतिम स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत आणि अधिकाऱ्यांकडून सर्व आवश्यक मंजुऱ्या मिळाल्या आहेत, आता हा भागीदारी व्यवसाय पुणे, बंगलोर आणि चेन्नईमध्ये प्रमुख तंत्रज्ञान केंद्रांमध्ये १०० कर्मचाऱ्यांसह संचालन सुरु करेल.

हा उद्योग वेगाने विस्तार करण्यासाठी सज्ज आहे, २०२५ च्या अखेरपर्यंत चार अंकी कर्मचाऱ्यांसह पुढे जाण्याची योजना आखण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांमध्ये भारतातील अव्वल अभियांत्रिकी प्रतिभावंतांना आकर्षित करण्यावर विशेष भर दिला गेला आहे. या भागीदारी व्यवसायामध्ये बीएमडब्ल्यू ग्रुप आणि टाटा टेक्नॉलॉजीज या दोघांकडे ५०% शेयर्स आहेत. ही भागीदारी ऑटोमोटिव्ह तंत्रज्ञान बिझनेस आयटीमध्ये नावीन्याला प्रोत्साहन देण्याचा सामायिक दृष्टिकोन अधोरेखित करते.

बीएमडब्ल्यू टेकवर्क्स इंडिया अत्याधुनिक वाहनांसाठी सहजसुलभ, स्केलेबल सॉफ्टवेयर सोल्युशन्स तयार करून आणि अधिक चांगला डिजिटल अनुभव प्रदान करून बीएमडब्ल्यू ग्रुपच्या जागतिक धोरणासाठी पूरक ठरेल. संकल्पना तयार करण्यापासून सर्वसमावेशक अभियांत्रिकी आणि टर्नकी एसडीव्ही विकासापर्यंत, संपूर्ण उत्पादन मूल्य शृंखलेमध्ये टाटा टेक्नॉलॉजीजच्या क्षमता बीएमडब्ल्यूच्या भविष्यासाठीच्या मोबिलिटी सोल्युशन्ससाठी प्रमुख सॉफ्टवेयर योजनांमध्ये नावीन्याला प्रोत्साहन देईल आणि भारतातील प्रभावशाली प्रतिभावंतांपर्यंत पोहोचणे सोपे बनवेल.

भारतातील इंजिनीयर, जगासाठीहा सिद्धांत या भागीदारी व्यवसायाचा केंद्रबिंदू ठरेल. भारतातील असामान्य अभियांत्रिकी आयटी प्रतिभावंत एसडीव्ही, ऑटोमेटेड ड्रायव्हिंग, डिजिटल इन्फोटेन्मेन्ट आणि ऑटोमोटिव्ह डिजिटल सेवांसाठी धोरणात्मक सॉफ्टवेयर सोल्युशन्स विकसित करण्यात महत्त्वाची भूमिका निभावतील. ऑटोमोटिव्ह सॉफ्टवेयरव्यतिरिक्त, हा भागीदारी व्यवसाय बीएमडब्ल्यू ग्रुपच्या बिझनेस आयटीसाठी डिजिटल नावीन्य प्रदान करेल. परिणामी, बीएमडब्ल्यू टेकवर्क्स इंडिया या कंपनीच्या जागतिक उत्पादन नेटवर्कच्या डिजिटल परिवर्तनाला वेग मिळवून देईल आणि त्यासोबतच डिजिटल कस्टमर जर्नी विक्री प्रक्रियांना मजबूत करेल. एआय ऍप्लिकेशन्स आणि प्लॅटफॉर्म्सच्या विकासावर भर दिला जाईल, त्यामुळे सर्व प्रमुख व्यावसायिक प्रक्रियांचा वेग कार्यक्षमता वाढेल.

हा भागीदारी व्यवसाय युवा भारतीय प्रोफेशनल्सना अशा तंत्रांवर काम करण्याची एक अनोखी संधी प्रदान करतो, जो जागतिक स्तरावर मोबिलिटीच्या भविष्याला आकार देईल. स्थानिक प्रतिभांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि अत्याधुनिक ऑटोमोटिव्ह नावीन्यांना नवे रूप देण्याप्रती या व्यवसायाची बांधिलकी ऑटोमोटिव्ह तंत्रज्ञान इकोसिस्टिममध्ये ग्लोबल इनोव्हेशन हब म्हणून भारताची ओळख मजबूत करते. महत्त्वाकांक्षी प्रतिभावंत भागीदारी व्यवसायाचा भाग बनण्यासाठी आणि जागतिक प्रभाव निर्माण करणाऱ्या सोल्युशन्सना नवे रूप देण्यासाठी याठिकाणी अर्ज करू शकतात.

बीएमडब्ल्यू ग्रुपसोबत भागीदारी व्यवसायाच्या स्थापनेबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना टाटा टेक्नॉलॉजीजचे सीईओ आणि एमडी वॉरेन हॅरिस यांनी सांगितले, भारतात टाटा टेक्नॉलॉजीज ब्रँडचे स्थान मजबूत आहे, त्याचा लाभ घेत हा भागीदारी व्यवसाय अव्वल प्रतिभावंतांना आकर्षित करेल आणि मोबिलिटीच्या भविष्याची नवी व्याख्या रचणारी दूरदर्शी सोल्युशन्स विकसित करण्यासाठी एक मंच प्रदान करेलप्रीमियम, सॉफ्टवेयरसंचालित गाड्यांच्या अभियांत्रिकी, डिजिटल अनुभवांना वाढवण्यासाठी आणि त्यांच्या डिजिटल परिवर्तनाच्या यात्रेला वेग देण्यासाठी बीएमडब्ल्यू ग्रुपसोबत भागीदारी करताना आम्हाला खूप आनंद होत आहे.” 

टाटा टेक्नॉलॉजीजचे ऑटोमोटिव्ह सेल्सचे अध्यक्ष श्री नचिकेत परांजपे यांनी सांगितले,ऑटोमोटिव्ह तंत्रज्ञानाचा वेगवान विकास वाहनांचा विकास घडवून आणण्याच्या पद्धती बदलत आहे, या बदलामध्ये सॉफ्टवेयरडिफाइन्ड गाड्या सर्वात पुढे आहेत. टाटा टेक्नॉलॉजीजमध्ये आमची सखोल ऑटोमोटिव्ह विशेषज्ञता आणि मूल्य शृंखलेमध्ये एंडटूएंड सोल्युशन्ससंकल्पना आणि तपशीलवार अभियांत्रिकीपासून उत्पादन अभियांत्रिकी आणि टर्नकी एसडीव्ही विकासापर्यंतआम्हाला मोबिलिटीच्या भविष्याला आकार देण्यात बीएमडब्ल्यू ग्रुपचे समर्थन करण्यासाठी पूर्णपणे तयार करतात. या भागीदारी व्यवसायामार्फत आम्ही ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजीजच्या सीमा ओलांडून पुढे जाऊ, अशा गाड्या बनवू ज्या आधुनिक असतील, इतकेच नव्हे तर, जगभरातील ग्राहकांना असामान्य ड्रायव्हिंग अनुभव देखील प्रदान करतील.”

बीएमडब्ल्यू ग्रुपमध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि सॉफ्टवेयरचे सिनियर व्हाईस प्रेसिडेंट क्रिस्टोफ ग्रोट यांनी सांगितले,बीएमडब्ल्यू टेकवर्क्स इंडिया हा आमच्या जागतिक वेहिकल सॉफ्टवेयर डेव्हलपमेंट उपक्रमांचा एक लक्षणीय भाग आहे. भारतातील सॉफ्टवेयर प्रतिभावंत आमच्या भविष्यासाठीच्या सॉफ्टवेयरडिफाइन्ड गाड्यांसाठी खूप मूल्यवान ठरतील. गतिशील प्रक्रिया आणि अत्याधुनिक टूल्स यांच्यासह बीएमडब्ल्यू टेकवर्क्स इंडियामधील भारतीय अभियंते नाविन्यपूर्ण ऑटोमोटिव्ह डिजिटल अनुभव जसे की, ऑटोमेटेड ड्रायव्हिंग आणि अत्याधुनिक इन्फोटेन्मेन्ट सिस्टिम्स इत्यादी निर्माण करतील.”

बीएमडब्ल्यू ग्रुप आयटीचे सीईओ आणि सिनियर व्हाईस प्रेसिडेंट अलेक्झांडर बुरेश यांनी सांगितले, बीएमडब्ल्यू टेकवर्क्स इंडियासोबत आम्ही आमचे आंतरराष्ट्रीय आयटीहब धोरण सातत्याने प्रगत करत आहोत आणि आमच्या ग्लोबल बिझनेस आयटीचा विस्तार करत आहोत. टाटा टेक्नॉलॉजीजसोबत आमची भागीदारी धोरणात्मक दृष्ट्या एक महत्त्वाचे पाऊल आहे आणि आमच्या मूल्य शृंखलेमध्ये नाविन्यपूर्ण सॉफ्टवेयर सोल्युशन्स विकसित करण्यासाठी अधिक चांगली परिस्थिती प्रस्तुत करते. बीएमडब्ल्यू ग्रुपच्या डिजिटल परिवर्तनाला प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय तंत्रज्ञान प्रतिभावंतांचे स्वागत करताना आम्हाला खूप आनंद होत आहे.”

बीएमडब्ल्यू टेकवर्क्स इंडियाचे सीईओ आदित्य खेरा यांनी सांगितले,बीएमडब्ल्यू टेकवर्क्स इंडिया सुरु करून आम्ही जागतिक स्तराचे सॉफ्टवेयर हब तयार करत आहोत, जे बीएमडब्ल्यू ग्रुपच्या ऑटोमोटिव्ह सॉफ्टवेयर आणि बिझनेस आयटी धोरणामध्ये प्रमुख भूमिका बजावेल. सॉफ्टवेयरडिफाइन्ड गाड्यांमध्ये बीएमडब्ल्यू ग्रुप आणि टाटा टेक्नॉलॉजीजची लीडरशिप आणि त्यांच्या प्रॉडक्ट इंजिनीयरिंग उत्कृष्टता यांना एकत्र आणून आम्ही इनोव्हेशन आणि वृद्धीसाठी तसेच भारतातील अव्वल प्रतिभावंतांना बीएमडब्ल्यू ग्रुपच्या मोबिलिटी सोल्युशन्सच्या भविष्याला आकार देण्याची संधी देण्यासाठी तयार आहोत.”

बीएमडब्ल्यू टेकवर्क्स इंडियाच्या मॅनेजमेंट टीममध्ये दोन्ही पार्टनर कंपन्यांचे अनुभव एक्झिक्युटिव्ह आहेत. टाटा टेक्नॉलॉजीजच्या वतीने आदित्य खेरा, सीईओ म्हणून तर स्वेता गिरिनाथम सीएफओ आहेत. बीएमडब्ल्यू ग्रुपकडून स्टेफन फ्लेडर हे एंटरप्राइज आयटीचे सीओओ आणि ऑलिव्हर शेकल ऑटोमोटिव्ह सॉफ्टवेयरचे सीओओ आहेत.