जागतिक हॅण्डवॉशिंग डेच्या निमित्ताने अधिक निरोगी जीवनशैलीसाठी हातांच्या स्वच्छतेचे महत्त्व ठळकपणे मांडणारी गोदरेज मॅजिकची प्रभावी मोहीम

By: Editor_Pratik

On: Wednesday, October 16, 2024 9:59 AM

Godrej Magic हॅण्डवॉशिंग डे
Google News
Follow Us

 

  • गोदरेज इंडस्ट्रीज समूहाच्या मालकीचा मीडिया मंच Godrej L’Affaire वर हात स्वच्छ धुण्याच्या नित्यक्रमावर भर देणाऱ्या डिजिटल फिल्मचे प्रसारण
  • ५०० हून अधिक वर्गांतील मुलांना शिक्षित करणाऱ्या हॅण्ड हायजिन कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी टेक फॉर इंडियाशी भागीदारी
  • हा संदेश डिजिटल दुनियेत पसरविण्यासाठी ५० हून अधिक कंटेन्ट क्रिएटर्सना केले सहभागी

नॅशनल सॅम्पल सर्व्हे (NSS)द्वारे भारतात घेण्यात आलेल्या एका सर्वेक्षणानुसार देशात फक्त ३५.८२ टक्‍के लोक भोजनाआधी नियमितपणे हात स्वच्छ धुतात तर ६० टक्‍के घरांमध्ये फक्त पाण्याने हात धुतले जातात. कोव्हिड-१९ नंतर आयुष्य पुन्हा एकदा सुरळीत सुरू झाल्यानंतर नियमितपणे हात धुण्याची रोजची सवय बाळगण्याचे प्रमाण कमी झाल्याचेही अनेक अहवालांतून ठळकपणे मांडण्यात आले आहे. त्यामुळे योग्य प्रकारे हात धुण्याची पद्धत आणि नियमितपणे हात धुण्याची सवय लावून घेण्याचा संदेश लोकांपर्यंत पोहोचविण्याची कधी नव्हे इतकी निकड निर्माण झाली आहे. “व्हाय आर क्लीन हॅण्ड्स स्टिल इम्पॉर्टन्ट” हे या वर्षीच्या जागतिक हॅण्डवॉशिंग डे (ऑक्टो १५) चे विषयसूत्र, आजही संसर्गांना रोखण्यामध्ये हातांची स्वच्छता किती महत्त्वाची भूमिका बजावते ही बाब अधोरेखित करणारे आहे.

यंदाच्या जागतिक हॅण्डवॉशिंग डेच्या निमित्ताने याच विषयसूत्राशी मेळ साधत गोदरेज मॅजिक हॅण्डवॉश, या गोदरेज कन्झ्युमर प्रोडक्ट्स लि. (GPCL)च्या रेडी-टू-मिक्स हॅण्डवॉशने हात धुण्याच्या योग्य पद्धतींचा पुरस्कार करण्यासाठी व त्याला दैनंदिन सवयीचा भाग बनविण्यास प्रोत्साहन देण्यासाठी एक जागरुकता मोहीम सुरू केली आहे. ही मोहीम एका अत्यंत महत्त्वाच्या सत्याला अधोरेखित करते: हातांची स्वच्छता ही एक काम उरकण्‍याच्‍या पद्धतीने साध्य होऊ शकत नाही. हात धुणे महत्त्वाचे आहेच, पण त्याचबरोबर ती आजारांना नियंत्रणात ठेवण्याची व त्यायोगे एक निरोगी जीवनशैली जगण्यासाठीची एक महत्त्वाची प्रतिबंधक उपाययोजनाही आहे यावर मोहिमेद्वारे लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

हा संदेश अधिक प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी गोदरेज मॅजिकने गोदरेज इंडस्ट्रीज समूहाच्या स्वत:च्या मालकीचा मीडिया प्लॅटफॉर्म Godrej L’Affaire शी भागीदारी केली असून. या मंचाद्वारे व्यवस्थितपणे हात धुण्याचे महत्त्व अधोरेखित करण्याचा संदेश खेळकर तरीही प्रभावी पद्धतीने देणारी एक डिजिटल फिल्म प्रकाशित केली आहे. आयुष्यात तुम्ही शॉर्टकट शोधायला गेलात तर काय होतं? अपूर्ण प्रयत्नांतून अखेरीस अपूर्ण परिणामच हाती येतात आणि स्वच्छताही त्याला अपवाद नाही. कल्पना करा, दिवसभर तुम्ही ज्यांवर विसंबून असता त्या सगळ्या गोष्टी एखाद दिवशी अर्ध्याच मिळाल्या तर काय होईल? अर्धाच लंच घ्यायचा, कामासाठी अर्धच डेस्क मिळणार आणि खुर्चीसुद्धा अर्धीच असणार. तुम्ही फक्त एकच हात धुता तेव्हासुद्धा हेच घडत नाही का? विनोदाच्या माध्यमातून आणि चतुराईने रचलेल्या प्रसंगांतून ही फिल्म एक साधा पण अत्यावश्यक संदेश देते: ‘ऑल ऑर नथिंग’ –  योग्य स्वच्छता म्हणजे संपूर्ण स्वच्छता अन्यथा ती स्वच्छताच नाही.

हातांची स्वच्छता राखण्याच्या योग्य पद्धतींचा मुलांमध्ये प्रचार करण्यासाठी गोदरेज मॅजिकने टेक फॉर इंडिया या शैक्षणिक समानतेसाठी काम करणाऱ्या, ना-नफा तत्त्वावर चालणाऱ्या संस्थेशी भागीदारी केली आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून टेक फॉर इंडिया नेटवर्कचा भाग असलेल्या विद्यार्थ्यांना हातांची स्वच्छता जपण्याच्या परिणामकारक सवयींचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. समाजापर्यंत पोहोचण्याच्या हेतूने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाद्वारे ५०० हून अधिक वर्गांतील मुलांना शिक्षित केले जाणार आहे.

या मोहिमेविषयी आपले मत व्यक्त करताना गोदरेज कन्झ्युमर प्रोडक्ट्स लि. (GCPL)च्या मार्केटिंग (पर्सनल केअर) विभागाचे प्रमुख नीरज सेंगुत्तुवन म्हणाले, कोव्हिडनंतरच्या काळात आयुष्य पुन्हा एकदा रुळावर आले असले तरीही चांगल्या स्वच्छतेचे महत्त्व आजही अबाधित आहे याची आठवण करून देण्यासाठी जागतिक हॅण्डवॉशिंग डे हे एक अचूक निमित्त आहे. गोदरेज मॅजिक हॅण्डवॉशच्या साथीने आम्ही फक्त एक उत्पादन देऊ करत नसून मानसिकता बदलण्यास प्रोत्साहन देत आहोत. भारताचा पहिलावहिला पॉवडर-टू-लिक्विड हॅण्डवॉश गोदरेज मॅजिक नव्या संकल्पनांना चालना देणारा, लोकांसाठी स्वच्छतेच्या योग्य पद्धती वापरणे सुलभ बनविणारा, फक्त १० रुपये इतक्या माफक किंमतीत मिळणारा हॅण्डवॉश आहे जो तुमच्या नित्यक्रमाचा एक अविभाज्य भाग आहे.”

गोदरेज इंडस्ट्रीज समूहाचे चीफ कम्युनिकेशन्स ऑफिसर्स सुजित पाटील म्हणाले, “Godrej L’Affaire या गोदरेज इंडस्ट्रीय समूहाच्या मालकीच्या मीडिया मंचाची संकल्पना जीवनशैलीतील बारकाव्यांविषयी अर्थपूर्ण चर्चा सुरू होण्यास निमित्त मिळावे यादृष्टीने तयार करण्यात आली होती. कोव्हिड-१९ नंतर सारे काही सुरळीत झाल्यांतर प्रभावीपणे हात धुण्याचे गांभीर्य डळमळीत झाल्याच्या माहितीचा आधार घेत हात धुण्याच्या प्रभावी पद्धतींचे तत्त्व पुन्हा सर्वांसमोर मांडणे योग्य ठरेल असे आम्हाला वाटते. हातांची चांगली स्वच्छता राखण्याशी तडजोड होऊ शकत नाही, तो निरोगी जीवनशैलीचा अविभाज्य भाग आहे आणि एक परिपूर्ण आयुष्य जगण्यासाठी तुम्हाला या सवयीची मदत होऊ शकते याची लोकांना आठवण जागतिक हॅण्डवॉशिंग डे साजरा करण्यासाठी सुरू झालेल्या या मोहिमेच्या माध्यमातून करून द्यायची आहे.”

मुलांबरोबरच्या आउटरीज कार्यक्रमाविषयी बोलताना टेक फॉर इंडियाच्या संस्थापक आणि सीईओ शाहीन मिस्त्री म्हणाल्या, “लहान मुलांच्या मनावर चांगल्या सवयी बिंबविणे म्हणजे जन्मभरासाठीच्या स्वास्थ्याचा पाया रचण्यासारखे असते. हातांची स्वच्छता आणि हात धुण्याची योग्य पद्धत यांचे महत्त्व मुलांना शिकविणे हे त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यावश्यक आहे. म्हणूनच गोदरेज मॅजिक टेक फॉर इंडियाच्या सहयोगाने एक कार्यक्रम राबवत आहे, ज्यात ५०० हून अधिक वर्गांतील मुलांना हातांच्या स्वच्छतेविषयी शिक्षित केले जाणार आहे. टेक फॉर इंडियाचे स्वयंसेवक वर्गांमध्ये प्रात्यक्षिके सादर करतील, ज्यात मुलांना हात धुण्याच्या योग्य पद्धती सांगितल्या जातील व त्यांच्यासाठी एक समृद्ध अनुभव तयार करतील.”

या उपक्रमाला जगभरात पोहोचविण्यासाठी ब्रॅण्डने डॉक्टर्स, पालकत्व विषयातील तज्ज्ञ आणि स्टॅण्ड-अप कॉमेडियन्स यांच्यासह ५० कन्टेन्ट क्रिएटर्सना या मोहिमेत सामील करून घेतले आहे. त्याचबरोबर गोदरेज मॅजिक विविध मीडिया पार्टनरशिप्सच्या माध्यमातूनही या मोहिमेचा प्रचार करेल.

पॅनडेमिकनंतरच्या जगामध्ये सवयीने करायच्या साध्या-साध्या गोष्टी सहज सोडून दिल्या जाऊ शकतात. अशावेळी योग्य प्रकारे हात धुणे ही स्वत:चे संरक्षण करण्यासाठी जपायची सर्वात महत्त्वाची पायरी आहे. दोन्ही हात धुण्याचा संबंध फक्त स्वच्छतेशी नाही – तर परिपूर्णतेने, सुरक्षितपणे आणि जबाबदारीने जगण्याशी आहे. गोदरेज मॅजिक हॅण्डवॉश हातांच्या स्वच्छतेशी निगडित सवयींवरील विचारमंथनासाठी सगळ्यांनाच आमंत्रण देत आहे. हात धुणे हे फक्त एक काम नव्हे – खरेतर ती स्वत:ची काळजी घेण्यासाठी केलेली एक दैनंदिन कृती आहे.

फिल्मसाठी लिंक: https://www.youtube.com/watch?v=O2HdPmnZIn8

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now