अजित पवार या राष्ट्रीय नेतृत्वाकडे पाहूनच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या घड्याळाच्या चिन्हावर माऊली कटके यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन करत शिरूर हवेली विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या वतीने ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांनी आज मोठे शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला .यावेळी हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता .
यावेळी हवेलीतील अनेक गावचे आजी -माजी सरपंच आजी- माजी उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य तसेच सोसायटीचे पदाधिकारी व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामुळे शिरूर हवेलीला माऊली वादळ आल्याचे चित्र निर्माण झाले होते. यावेळी काढलेल्या रॅलीला प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता.
महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार गटाचे विद्यमान आमदार अशोक पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असून त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे .त्यांना कडवे आवाहन निर्माण करत हवेलीमध्ये प्रथमच उमेदवारी मिळाल्याने माऊली कटके यांनी आपला उमेदवारी अर्ज मंगळवारी दाखल केला.
ऐनवेळी महाविकास आघाडीतील ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर कटके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटात प्रवेश करुन महाविकास आघाडीला तसेच ठाकरे गटाला जोरदार धक्का देत महाविकास आघाडीपुढे एक कडवे आव्हान उभे केले आहे.तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शांताराम कटके व भारतीय जनता पार्टीचे या मतदारसंघातील प्रबळ दावेदार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
प्रदीप कंद यांनी देखील कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन शक्ती करुन आपण ही कार्यकर्त्यांच्यां आग्रहा खातर उमेदवारी अर्ज दाखल केला आहे . त्यामुळे नेमकी दुरंगी की तिरंगी लढत होणार याकडे सर्वसामान्य जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.
पुन्हा एकदा लोकसभेसारखी विधानसभेची निवडणूक दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात तुल्यबळ लढत होणार आहे .