पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहात पायाभूत सुविधांच्या सुधारणांना समर्थन देते
माइंडस्पेस बिझनेस पार्क्स REIT (BSE: 543217 | NSE: MINDSPACE) (‘Mindspace REIT’), भारतातील चार प्रमुख कार्यालयीन बाजारपेठांमध्ये स्थित दर्जेदार ऑफिस निर्मिती करणारे मालक आणि विकासक आपल्या कामातून सीएसआर आणि समुदायाच्या प्रयत्नांना बळकटी देतात. पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहात पायाभूत सुविधांच्या वाढीसाठी ते प्रयत्नशील आहेत. या उपक्रमात कर्मचारी आणि तुरुंगातील 6,500 कैदी अशा दोघांसाठी आवश्यक पायाभूत सुविधांच्या गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशाने पुढील गोष्टी विकसित करण्यात येणार आहेत.
- सुधारित वैद्यकीय सेवेसाठी पूर्ण सुसज्ज प्राथमिक आरोग्य केंद्र
- पिण्याच्या स्वच्छ पाण्यासाठी फिल्टरेशन प्रणालीसह पाण्याची साठवण टाकी
- पुरुष आणि महिला कर्मचारी सदस्यांसाठी चेंजिंग रूम्स आणि विश्रांती कक्ष
- स्वच्छतेसाठी नवीन शौचालये, आणि
- आपत्कालीन प्रतिसाद क्षमता मजबूत करण्यासाठी 24×7 रुग्णवाहिका
तुरुंगातील कर्मचारी आणि कैदी या दोघांच्याही मूलभूत गरजा पूर्ण करत समाजात बदल घडवण्यासाठी माइंडस्पेस REIT चे समर्पण प्रतिबिंबित करते.
या उपक्रमाबद्दल माइंडस्पेस REIT चे सीईओ श्री. रमेश नायर म्हणाले, “व्यावसायिक यशापलीकडे जात सभोवतालच्या समुदायाच्या उन्नतीसाठी आमची भूमिका आहे, यावर आमचा विश्वास आहे. येरवडा मध्यवर्ती कारागृहात हा उपक्रम राबवण्याचे कारण म्हणजे, अशा ठिकाणी काम करणाऱ्यांच्या गरजांकडे कायम दुर्लक्ष होते. त्यामुळेच अशा ठिकाणी हा उपक्रम सुरू करणे हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. अत्यावश्यक पायाभूत सुविधा आरोग्य सेवा, स्वच्छता तसेच आपत्कालीन प्रतिसाद प्रदान करून- सन्मान, सुरक्षितता आणि जीवनाची सुधारित गुणवत्ता वाढवणे हे आमचे ध्येय आहे. असे चिरस्थायी बदल जो केवळ व्यक्तींनाच नव्हे तर समाजाला देखील एक समाज म्हणून मजबूत करतात.”
माईंडस्पेस REIT ने शिक्षण आणि आरोग्यसेवेपासून ते प्राणी कल्याण, कौशल्य विकास आणि संशोधनापर्यंत विविध सामाजिक गोष्टींमध्ये प्रभावी योगदान दिले आहे. हे प्रयत्न सशक्त, अधिक समावेशक समुदायांना चालना देण्यासाठी संस्थेची बांधिलकी दर्शवतात. चांगल्या समाजाच्या निर्मितीपासूनच चांगले व्यवसाय निर्माण होतात, यावर संस्थेचा संपूर्ण विश्वास आहे.