मलाबार गोल्ड अँड डायमंड्सचे अमेरिकेतील मुख्य शोरूम लॉस एंजेल्समध्ये केले सुरू

ऑक्टोबरमध्ये जगभरात आणखी २० नवीन शोरूम सुरु करणार

जगातील सर्वात मोठ्या दागिने निर्मात्या समूहांपैकी एक असलेल्या मलाबार गोल्ड अँड डायमंड्सचे अमेरिकेतील मुख्य शोरूम लॉस एंजेल्समध्ये सुरू झाले आहे. उत्तर अमेरिकेतील कंपनीच्या विस्तारातील हा मैलाचा दगड आहे. हे नवीन शोरूम मलाबार गोल्ड अँड डायमंड्स अमेरिकेतील सर्वात मोठे आणि पाचवे लोकेशन आहे.

हा उद्घाटन समारंभ कॅलिफोर्नियाच्या काँग्रेसवुमन मिशेल स्टील यांच्या नेतृत्वाखाली झाला. यावेळी मलाबार ग्रुपचे अध्यक्ष एमपी अहमद, उपाध्यक्ष केपी अब्दुल सलाम, आंतरराष्ट्रीय कामकाज विभागाचे व्यवस्थापकीय संचालक शामलाल अहमद, उत्तर अमेरिका रिजनल हेड जोसेफ ईपन आणि व्यवस्थापनातील अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

हे शोरूम आर्टेशिया सिटी येथे ६,५०० चौरस फुटावर पसरलेले असून यामध्ये २० देशांतील ३०,००० दागिन्यांच्या डिझाईन आहेत. यात २५ एक्सक्लुझिव्ह ब्रँड्स विशेष आकर्षण ठरणार आहेत. तसेच ग्राहक आपल्या वैयक्तिक आवडीनुसार दागिने निवडू शकतात. उद्घाटनाच्या निमित्ताने हिरे आणि रत्नांच्या दागिन्यांच्या खरेदीवर ग्राहकांना हमखास सुवर्ण नाणे मिळणार असून ही ऑफर ३ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.

यावेळी बोलताना मलाबार ग्रुपचे अध्यक्ष एमपी अहमद म्हणाले, “लॉस एंजेल्समधील आमचे मुख्य शोरूम हे दागिन्यांच्या खरेदीचा असामान्य अनुभव प्रदान करण्याप्रति आमचे समर्पण अधोरेखित करते. हे लोकेशन आमच्यासाठी विशेष महत्त्वाचे आहे कारण आमच्या विस्ताराच्या धोरणात उत्तर अमेरिकेला विशेष महत्त्वाचे स्थान आहे. या ऑक्टोबरमध्ये जगभरात २० नवे शोरूम उघडण्याची आमची योजना जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे. तसेच, जगातील आघाडीचे दागिने निर्माते होण्याच्या आमच्या ध्येयाकडे वाटचाल करताना आम्हाला मिळणाऱ्या आधाराबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत.”

मलाबार गोल्ड अँड डायमंड्सचे अमेरिकेतील सहावे शोरूम अटलांटा, जॉर्जिया येथे लवकरच सुरू होणार आहे. सॅन फ्रान्सिस्को, सिएटल, ऑस्टिन, टँपा, व्हर्जिनिया, डेट्रॉईट, ह्यूस्टन, शार्लोट, फिनिक्स, न्यूयॉर्क आणि सॅन डिएगो यांसारख्या शहरांना लक्ष्य करत कंपनीने विस्ताराची महत्वाकांक्षी योजना आखली आहे. हा ब्रँड कॅनडामध्ये ब्रिटीश कोलंबिया आणि अल्बर्टामध्ये आपली उपस्थिती वाढविणार आहे.

ऑक्टोबरमध्ये सुरू होणाऱ्या २० नवीन शोरूमपैकी सात आधीच कार्यरत झाले आहेत. तसेच अमेरिका, यूएई, कतार, सौदी अरेबिया आणि भारतात आणखी १३ शोरूम्स सुरू होणार आहेत. मलाबार गोल्ड अँड डायमंड्सचे सध्या १३ देशांमध्ये ३६० हून अधिक शोरूम्स आहेत. तसेच त्यांच्या नफ्यातील ५ टक्के वाटा विविध सामाजिक जबाबदारी प्रकल्पांना समर्पित करण्यात येतो