जगभरातील हिशेबनीस आणि आर्थिक व्यावसायिकांची संघटना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अकाऊंटंट्स (आयएमए) सिम्बॉयसिस स्कूल ऑफ आर्ट्स अँड कॉमर्सच्या सहकार्याने सर्टिफाईड मॅनेजमेंट अकाऊंटंट (सीएमए) हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करत आहे.
एका सहकार्य कराराच्या (एमओयू) माध्यमातून या सहयोगाला औपचारिक स्वरूप देण्यात आले आहे. याद्वारे वाणिज्य पदवीधरांना जागतिक पातळीवर आकर्षक करिअरची संधी लाभणार आहे. तसेच व्यवस्थापकीय लेखा (मॅनेजमेंट अकाऊंटिंग) क्षेत्रातील विद्यार्थ्यांची व्यावसायिक क्षमता उंचावण्याच्या दृष्टीने हे एक लक्षणीय पाऊल ठरणार आहे.
या एमओयूनुसार सिम्बॉयसिस आपल्या विद्यार्थ्यांना आयएमएचे व्यावसायिक अभ्यासक्रम उपलब्ध करून देईल आणि ते त्यांच्या अभ्यासासाठी पूरक ठरतील. यामध्ये आर्थिक नियोजन, कामगिरी, विश्लेषण आणि धोरणात्मक आर्थिक व्यवस्थापन यावर केंद्रित असलेल्या आयएमएच्या प्रतिष्ठेच्या प्रमाणपत्राचा समावेश आहे. त्यामुळे पदवीधरांना अष्टपैलूत्व येईल आणि विविध व्यावसायिक वातावरणात ते उत्कृष्ट ठरण्याची हमी मिळेल.
आयएमएचे अध्यक्ष मायकल डेप्रिसो म्हणाले, “जागतिक बाजारपेठेच्या झपाट्याने बदलणाऱ्या परिस्थितीच्या संदर्भात भावी व्यवसायिकांना सर्वसमावेशक कौशल्याने समृद्ध करणे सर्वाधिक महत्त्वाचे आहे. जागतिक पातळीवर मॅनेजमेंट अकाउंटिंगचा प्रसार करण्याच्या आमच्या मिशनमध्ये सिम्बॉयसिस सोबतची भागीदारी हे एक लक्षणीय पाऊल आहे.
सिम्बॉयसिसच्या विद्यार्थ्यांना आमचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम उपलब्ध करून देऊन आम्ही त्यांना त्यांच्या करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी एक मजबूत पाया उपलब्ध करून देत आहोत. सध्याच्या रोजगाराच्या स्पर्धात्मक बाजारपेठेत आवश्यक असलेल्या अत्यंत गरजेची कौशल्ये त्यामुळे त्यांना मिळतील.”
आयएमएचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम सिम्बॉयसिसच्या सध्याच्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्यात येतील जेणेकरून ते त्यांच्या पहिल्या वर्षापासून उपयोगी ज्ञानाचा मागोवा घेऊ शकतील. पदवी मिळण्यापूर्वीच सीएमए परीक्षा उत्तीर्ण होण्याची त्यांना संधी मिळेल. विद्यार्थ्यांना सदस्यत्व, परीक्षा, प्रशिक्षण आणि अभ्यास साहित्याचे शुल्क द्यावे लागेल. यात सिम्बॉयसिस स्कूल ऑफ आर्ट्स अँड कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना विशेष सूट देण्यात येईल.
शिवाय आयएमए या महाविद्यालयाशी संयुक्त चर्चासत्रे, परिषद आणि संशोधन प्रकल्पासाठी सहकार्य करेल. त्यातून विद्यार्थ्यांचे शिक्षण उंचावेल आणि उद्योगाची माहिती मिळेल. याशिवाय, आयएमएच्या अकॅडमी सदस्यांना संशोधन अहवाल, केस स्टडी आणि ऑनलाईन अभ्यासक्रमाच्या अत्यंत विशाल अशा ग्रंथालयाचा लाभ मिळेल.
या एमओयूबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना सिम्बॉयसिस स्कूल ऑफ आर्ट्स अँड कॉमर्सचे प्राचार्य डॉ. हृषिकेश सोमण म्हणाले, “आमच्या विद्यार्थ्यांना सीएमए उपलब्ध करून देणाऱ्या आयएमएशी सहकार्य करायला मिळणे हा सिम्बॉयसिसचा सन्मानच आहे. या एकात्मिक प्रमाणपत्र अभ्यासक्रमामुळे आमच्या विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवर स्पर्धा करण्यास तसेच मॅनेजमेंट अकाउंटिंगच्या क्षेत्रात तज्ञता मिळविण्यास मदत होईल. भविष्यात आयएमएशी भरीव सहयोग करण्याची आम्हाला अपेक्षा आहे.”
या सहयोगामुळे विद्यार्थी जागतिक पातळीवर स्पर्धा करण्यास सक्षम होतील. त्यांच्यात सखल तांत्रिक मॅनेजमेंट अकाउंटिंगची कौशल्ये व ज्ञान वाढेल. तसेच व्यावसायिक वाढ व यशासाठी त्यांना अपरिमेत संधी उपलब्ध होतील.