मुळशी, जुलै, २०२४: टाटा केमिकल्स सोसायटी ऑफ रूरल डेव्हलपमेंट (टीसीएसआरडी) या टाटा केमिकल्सच्या सीएसआर विभागाने कंपनीच्या समुदाय विकास उपक्रमाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून “लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट” या स्वयंसेवी संस्थेच्या सहयोगाने पुणे जिल्ह्यातील मुळशीमध्ये उपजीविका व कौशल्य प्रशिक्षण केंद्र आज सुरु केले. २०२४-२५ या आर्थिक वर्षात टाटा केमिकल्स इनोव्हेशन सेंटरच्या आजूबाजूच्या १० गावांमधील सुमारे ४३० व्यक्तींना या केंद्राचा लाभ मिळणार आहे.
उपजीविका पुरवण्यासाठी आणि कौशल्य विकास घडवून आणण्यासाठी या केंद्रामध्ये प्रशिक्षण पुरवले जाईल, इतकेच नव्हे तर, प्रशिक्षित व्यक्तींना रोजगार मिळवून देण्यासाठी किंवा त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी साहाय्य केले जाते. टीसीएसआरडी आणि एलओएलटीने मुळशीमध्ये सुरु केलेल्या या सर्वसमावेशक कौशल्य केंद्रामध्ये लघुकालीन प्रशिक्षण वर्ग चालवले जातील. यामध्ये एसी टेक्निशियन, इलेक्ट्रिशियन, कम्प्युटर्स, ब्युटी केयर, इंग्रजी संभाषण, मेहेंदी डिझाईन आणि जॉब रेडीनेस ट्रेनिंग यांचा समावेश असेल.
टाटा केमिकल्सचे हेड – इनोव्हेशन, आरअँडडी, सीक्युएच आणि चीफ एथिक्स काऊंसेलर, डॉ रिचर्ड लोबो म्हणाले, “मुळशीमधील आमच्या इनोव्हेशन सेंटरच्या जवळ अशाप्रकारचे पहिले उपजीविका आणि कौशल्य विकास केंद्र सुरु करत असल्याची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे. वैविध्यतेवर भर देत, शिक्षण आणि व्यावसायिक प्रशिक्षणामार्फत स्थानिक सक्षमतेला प्रोत्साहन देण्याप्रती टाटा केमिकल्सची बांधिलकी या महत्त्वपूर्ण टप्प्यामध्ये अधोरेखित झाली आहे. आजूबाजूच्या भागातील व्यक्तींना आवश्यक कौशल्ये आणि संसाधने पुरवून, सक्षम करून शाश्वत, पर्यावरणपूरक विकासाला चालना देण्याचा व आर्थिक स्वावलंबनासाठी संधी निर्माण करण्याचा आमचा उद्देश आहे. मुळशी भागातील व्यक्ती आणि कुटुंबांवर या केंद्राचा सकारात्मक प्रभाव निर्माण होईल याची आम्हाला खात्री आहे. हे व्हिजन प्रत्यक्षात साकार करण्यासाठी ज्या सह्योगी आणि भागधारकांनी आम्हाला सहकार्य केले त्या सर्वांचे आम्ही आभारी आहोत.”
टाटा केमिकल्सचे मुख्य – आरोग्य, सुरक्षा आणि पर्यावरण आणि सीएसआर श्री आलोक चंद्रा यांनी सांगितले, “समुदायांच्या नेमक्या गरजा काय आहेत याचा काळजीपूर्वक अभ्यास करून, त्यानुसार तयार करण्यात आलेल्या आमच्या सीएसआर उपक्रमांच्या माध्यमातून समाजावर सकारात्मक प्रभाव निर्माण करण्यासाठी टाटा केमिकल्समध्ये आम्ही बांधील आहोत. आम्ही केलेल्या एका सखोल अभ्यासामध्ये असे आढळून आले की, आमच्या इनोव्हेशन सेंटरच्या आजूबाजूच्या समुदायांमध्ये उपजीविका संधींची खूप मोठी कमतरता आहे. समुदायांमध्ये दीर्घकालीन सुधारणांना चालना देण्यासाठी आम्ही मुळशीमध्ये पहिले कौशल्य प्रशिक्षण केंद्र सुरु केले आहे. पर्यावरणपूरक, शाश्वत उपजीविकेसाठी आवश्यक कौशल्ये पुरवून, रोजगार मिळवण्यासाठी किंवा स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी सक्षम करून लोकांना, समुदायांना सबळ बनवावे हा आमचा उद्देश आहे. लाईट ऑफ लाईफ ट्रस्टसोबत केलेला सहयोग क्षमता उभारणी करण्यात आणि मुळशी भागामध्ये परिवर्तन घडवून आणण्यात मोलाचा ठरेल.”
लाईट ऑफ लाईफ ट्रस्टच्या संस्थापिका व मॅनेजमेंट ट्रस्टी श्रीमती विली डॉक्टर म्हणाल्या, “टाटा केमिकल्ससोबत आम्ही केलेला सहयोग सामाजिक व आर्थिक परिवर्तन घडवून आणण्यात समन्वयाची शक्ती कशी उपयुक्त ठरू शकते याचे उदाहरण आहे. प्रभावी सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी टीसीएसआरडी प्रसिद्ध आहे. या सहयोगामुळे आमचे प्रयत्न द्विगुणित होतील. या कौशल्य केंद्राच्या माध्यमातून मुळशी भागातील अनेक व्यक्तींच्या जीवनात विकास घडवून आणण्याच्या टाटा केमिकल्सच्या प्रयत्नांना हातभार लावण्याचा आमचा उद्देश आहे. हा उपक्रम पर्यावरणपूरक, शाश्वत रोजगार व उद्यमशीलतेसाठी आवश्यक कौशल्ये पुरवून व्यक्तींना सक्षम बनवून स्थानिक समुदायासाठी अधिक न्याय्य व समृद्ध भविष्य निर्माण करेल.”