‘एमएसबीटीई’तर्फे आयोजित वार्षिक परीक्षेत ‘सूर्यदत्त’च्या इंटेरियर डिझाईनच्या विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश

पुणे : महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या (एमएसबीटीई) वतीने घेण्यात आलेल्या वार्षिक परीक्षेत सूर्यदत्त एज्युकेश फाउंडेशनच्या पुणे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाईड टेक्नॉलॉजीच्या इंटेरियर डिझाईनच्या पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले. शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखत विद्यार्थ्यांनी संस्थेचा नावलौकिक वाढवला.
पदविकेच्या प्रथम वर्षात सुहानी हेमराजानी (८४ टक्के), श्रेयस काळे (८३.८० टक्के) आणि आलेफियाह (८०.८३ टक्के) यांनी, तर द्वितीय वर्षात आयुष पोकर्णा (८५.३० टक्के), प्रेम भिंताडे (७६.७० टक्के) आणि दिया कोठारी (७४ टक्के) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला. सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, उपाध्यक्ष व सचिव सुषमा चोरडिया, प्राचार्य अजित शिंदे यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

सुहानी हेमराजानी म्हणाली, “विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी अतोनात कष्ट करणारे, जागरूकपणे आपले ज्ञान विद्यार्थ्यांना देऊ करणारे प्राध्यापक मला भेटले. माझ्या या यशामध्ये सर्व शिक्षक, पालक व माझ्या मेहनतीचा वाटा आहे.” तर आयुष पोकर्णा याने इथे शिक्षकांनी फक्त पुस्तकी ज्ञानाचे नाही, तर प्रत्येक आव्हानांनचा सामना करता येईल, अशा पात्रतेचे बनवले असल्याची भावना व्यक्त केली.

अजित शिंदे म्हणाले, “विद्यार्थ्यांचे यश आनंददायक आहे. यामध्ये विद्यार्थ्यांसह माझ्या सर्व सहकाऱ्यांचा मोलाचा वाटा आहे. संस्थेची शिस्त आणि विद्यार्थ्यांची अभ्यास करण्याची इच्छा यामुळे शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखण्यात यश मिळाले आहे. आजवर चार हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी हा अभ्यासक्रम पूर्ण करून यशस्वी करिअर केले आहे.”