कात्रज येथील महावीरनगर येथील स.नं. २२/१/४४ येथे अवैद्य विद्युत केबल खोदाई केल्याप्रकरणी जी. एस. कन्ट्रक्शनच्या स्मिता रमेश शहा यांच्यावर पुणे महानगरपालिकेने रु. ९.५०,९७६/- (अक्षरी रु. नऊ लक्ष पन्नास हजार नऊशे श्यहात्तर रुपये फक्त) इतकी रक्कमेचा दंड ठोठावला आहे. सदरची बाब पुणे मनपाच्या ट्रेचिंग पॉलिसी गाईडलाईन्सचा भंग करणारी आहे. पुणे महानगरपालिके ची कोणतीही परवानगी न घेता अनाधिकृतपणे खोदाई केल्यास संबंधितांकडून पुर्नस्थापना आकार दंडासह वसूल करण्याचे मा. मुख्य सभा ठ.क्र. ५० दि. २०/५/२०१४ अन्वये धोरण निश्चित करण्यात आलेले आहे.
सदरील बाब सामाजिक कार्यकर्ते सनी निम्हण यांनी पुणे महानगरपालिकेच्या निदर्शनात आणून दिली होती आणि तसा तक्रार अर्ज दाखल केला होता. अंदाजे २६ २.मी. मातीमधून खोदाई करून विनापरवाना विद्युत केबल टाकण्यात आली होती. मुख्य अभियंता (पथ) त.क्र. पथ १/१३७ दि. ०२/०१/२०२४ अन्वये आपणावर पुणे महानगरपालिकेच्या धोरणानुसार संदर्भ कं. १ चे कार्यालयीन परिपत्रकानुसार दंडाची कारवाई करण्यात आली. अशी माहिती पत्रकाद्वारे कार्यकारी अभियंता (पथ) पुणे महानगरपालिका यांनी दिली आहे.