देशांतर्गत क्रेडिट रेटिंग एजन्सीजना चालना देण्याची गरज : अमिताभ कांत

पुणे, १६ जुलै २०२४केअरएज रेटिंग्स कन्व्हर्सेशन्स २०२४” परिषदेत जी२० शेर्पा आणि भारत सरकारच्या नीती आयोगाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अमिताभ कांत यांनी देशांतर्गत क्रेडिट रेटिंग एजन्सीजना चालना देण्याची गरज स्पष्ट केली आहे. त्यांनी सुयोग्य सार्वभौम क्रेडिट रेटिंग्स महत्त्वाचा प्रश्न असून तो फक्त भारतावरच नाही तर संपूर्ण जगातील उगवत्या अर्थव्यवस्थांवर प्रभाव टाकतो असे मत व्यक्त केले.

परिषदेत बीजभाषण देताना श्री. कांत यांनी सांगितले की, भारताला २०४७ पर्यंत विकसित देश व्हायचे असेल तर विकसनशील देशांकडे सुयोग्य क्रेडिट रेटिंग्स असणे आवश्यक आहे. त्यांनी जागतिक क्रेडिट रेटिंग एजन्सीज बायस्ड असल्याचे आणि भारताच्या शक्तिशाली आर्थिक पायाभूत गरजांचे मूल्यमापन वस्तुनिष्ठ पद्धतीने करत नसल्याचे मत व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, विकसनशील देशांमध्ये गुंतवणूक करणे हे जास्त धोकादायक असल्याचे मत वस्तुनिष्ठ आर्थिक गणितांवर आधारित नाही तर त्याच्यावर एककल्ली मूल्यमापनाचा मोठा प्रभाव पडतो.

केअरएज रेटिंग्सने कन्व्हर्सेशन्स २०२४या त्यांच्या वार्षिक कार्यक्रमाचे आयोजन पुण्यात  केले. “ग्लोबल कॅपिटल फ्लो अँड रिस्क इन ए चेंजिंग वर्ल्ड ऑर्डर” या कार्यक्रमातून ख्यातनाम विचारवंत आणि उद्योगातील तज्ञांना एकत्र आणले गेले. जी२० शेर्पा आणि भारत सरकारच्या नीती आयोगाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अमिताभ कांत हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. त्यांच्यासोबत स्टेट बँक ऑफ इंडियाचे उपव्यवस्थापकीय संचालक श्री. गुलशन मलिक आणि कल्याणी ग्रुपचे अध्यक्ष श्री. बाबासाहेब नीळकंठ कल्याणी हेदेखील उपस्थित होते.

श्री. मेहुल पांड्या, व्यवस्थापकीय संचालक आणि समूह मुख्य कार्यकारी अधिकारी केअरएज रेटिंग्स म्हणाले की, “या चर्चासत्रांमधून जागतिक रोख रकमांचा प्रवाहाच्या संदर्भावर, वाढीचे चालक तसेच सार्वभौम रेटिंगच्या परिणामांच्या दृष्टीकोनातून आव्हाने चर्चा केली गेली. विकसित अर्थव्यवस्था आणि उगवत्या अर्थव्यवस्थांमधील कर्जाच्या पातळ्या नक्कीच वेगवेगळ्या आहेत. उगवत्या अर्थव्यवस्थांच्या वाढीची क्षमता आणि त्यांना आवश्यक असलेली गुंतवणूक यांच्याकडे सार्वभौम रेटिंग्स पद्धतीने पाहिले गेले पाहिजे. या बाबींवर पारदर्शक पद्धतीने काम केले गेले पाहिजे. आमच्या मते, दोन्ही परीक्षकांनी पारदर्शक असले पाहिजे, जेणेकरून ज्या संस्थेचे मूल्यमापन केले गेले आहे त्यांना पद्धत आणि तिचे काम यांच्याबाबत माहिती मिळेल.”

श्री. कांत यांनी भारतीयांना जास्त महत्त्वाकांक्षी असले पाहिजे असे मत व्यक्त केले. त्यांच्या मते देश उगवत्या आणि अद्ययावत तंत्रज्ञानांमध्ये काम करत नाही तोपर्यंत भारताला वेगाने विकसित होणे कठीण असेल. त्यांनी सांगितले की, भारताची वाढ अद्ययावत क्षेत्रांमधून होईल आणि त्यामुळे भारताला अत्यंत वेगाने वाढायचे असेल तर भारताने तीन दशके किंवा अधिक काळ वार्षिक नऊ ते १० टक्क्यांनी विकसित व्हावे लागेल. तथापि, त्यांनी तंत्रज्ञानांचा गैरवापर समाजामधील संघर्षासाठी कशा रितीने केला जाऊ शकतो यावर मत व्यक्त केले आणि आण्विक ऊर्जेसारख्या आंतरराष्ट्रीय विनियमांची गरज स्पष्ट केली. तसेच मुलभूत नैतिकतेबाबत आणि या तंत्रज्ञानांसमोरील आव्हाने व समाजाच्या फायद्यासाठी त्या कशा रितीने कार्यरत होतील याबाबत ही मत व्यक्त केले.