डॉ. अनिलकुमार गायकवाड सामाजिक सेवाकुंडचे केरळच्या राज्यपालांच्या हस्ते शुक्रवारी उद्घाटन

पुणे : डॉ. अनिलकुमार गायकवाड सामाजिक सेवाकुंड पुणे कार्यालयाचा उद्घाटन सोहळा येत्या शुक्रवारी (दि. १९ जुलै) सायंकाळी ६ वाजता स्वामीकृपा बिल्डिंग, मुंबई-बंगळुरू महामार्गालगत, वारजे येथे होणार आहे. केरळचे राज्यपाल महामहिम आरिफ मोहम्मद खान व रक्षा मंत्रालयाचे प्रमुख सल्लागार लेफ्ट. जनरल व्ही. जी. खंडारे यांच्या शुभहस्ते होणाऱ्या या उद्घाटन सोहळ्यावेळी राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी, ग्लोबल स्ट्रॅटेजिक फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. अनंत भागवत, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अनिलकुमार गायकवाड, सेवाकुंडाचे अध्यक्ष अश्वजीत भैय्या गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

डॉ. अनिलकुमार गायकवाड सामाजिक सेवाकुंडाच्या माध्यमातून गरीब, गरजू, दिव्यांग विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, उच्च शिक्षणासाठी अर्थसहाय्य, पर्यावरण रक्षणासाठी वृक्षारोपण, आरोग्य तपासणी व उपचार शिबिरे यासह इतर सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. पुण्यातही या सामाजिक कार्याचा विस्तार व्हावा, यादृष्टीने सामाजिक सेवाकुंडाच्या पुणे कार्यालयाची सुरुवात होत आहे, असे सेवाकुंडाचे उपाध्यक्ष नंदकिशोर शहाडे, विश्वस्त संजय कर्णिक, अतुल भोसले, अनिल सोनपाटकी, ऍड. महेंद्र दलालकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.