भारतातील इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादन कंपनी एथर एनर्जीने रिझ्टा या आपल्या फॅमिली स्कूटरची डिलिव्हरी सुरू करत असल्याचे सहर्ष जाहीर केले आहे. एथर एनर्जीचे सह-संस्थापक तरुण मेहता यांनी सोशल मीडियावरील आपल्या एका ट्वीटमध्ये म्हटले आहे की, “अखेरीस प्रतीक्षा संपली! आमची पहिली फॅमिली स्कूटर रिझ्टा तुमच्याकडे येण्यास सज्ज आहे. अहमदाबाद, पुणे, दिल्ली, लखनौ, आग्रा, जयपूर, नागपूर आणि आंध्र प्रदेशात डिलिव्हरी देण्यास सुरुवात झाली आहे आणि इतर शहरांत देखील लवकरच ही गाडी पोहोचेल!”
कुटुंबांना नजरेसमोर ठेवून तयार करण्यात आलेल्या रिझ्टामध्ये आरामदायकता, सुविधा आणि सुरक्षेवर भर देण्यात आला आहे. एथर रिझ्टाची सीट, या सेगमेन्टमधल्या इतर गाड्यांच्या तुलनेत मोठी आहे. यात यूझरसाठी भरपूर जागा आहे. यात 56एल इतकी स्टोरेज स्पेस आहे. ज्यात 34 एल इतकी जागा सीटच्या खाली आणि 22 एल फ्रंक अॅक्सेसरीचा पर्याय आहे. यामध्ये स्किडकंट्रोल™ आणि डॅशबोर्डवर व्हॉट्सअॅप सहित अनेक नवीन कनेक्टेड फीचर्स आहेत, जी वाहन चालवण्याचा अनुभव सुधारतात. मोठ्या बाजाराचा विचार करून गाडीची किंमत स्पर्धात्मक ठेवण्यात आली आहे. रिझ्टा 1,09,999/- (बंगळूर मध्ये एक्स-शोरूम किंमत) रु. पासून उपलब्ध आहे.
रिझ्टाची ठळक वैशिष्ट्ये:
मॉडेल्स आणि व्हॅरियन्ट्स: रिझ्टा S आणि रिझ्टा झेड या 2 मॉडेल्समध्ये रिझ्टा उपलब्ध आहे. यात 2.9 किलोवॅट तास बॅटरी असेलेले तीन व्हॅरियन्ट आहेत. टॉप-एंड मॉडेलमध्ये 3.7 किलोवॅट तास बॅटरी आहे.
- रेंज: 2.9 किलोवॅट तास व्हॅरियन्ट 123 किमी आयडीसी रेंज देते, तर 3.7 किलोवॅट तास व्हॅरियन्ट 159 किमी इतकी आकर्षक रेंज देते.
- सुरक्षा आणि आरामदायकता: रिझ्टामध्ये स्किडकंट्रोल™, फॉल सेफ™, इमर्जन्सी स्टॉप सिग्नल, थेफ्ट अँड टो डिटेक्ट; आणि फाइंड माय स्कूटर सारखी अभिनव सुरक्षा फीचर्स दिलेली आहेत. मार्केटमधल्या इतर गाड्यांच्या तुलनेत रिझ्टाची सीट भली मोठी आणि आरामदायक आहे आणि त्यात चालकाला पाय ठेवण्याची ऐसपैस जागा आहे.
उपलब्धता: पुणे, नागपूर, नाशिक, बारामती, अमरावती, अहमदनगर, अहमदाबाद, दिल्ली, लखनौ, आग्रा, जयपूर आणि आंध्र प्रदेशात रिझ्टाची डिलिव्हरी देण्यास सुरुवात झाली आहे. उपलब्धता झटपट व्यापक करण्यासाठी एथर एनर्जी कटिबद्ध आहे आणि लवकरच देशभरातील इतर शहरांत रिझ्टाची डिलिव्हरी मिळू लागेल.