७५ वर्ष पूर्ण: हिताची एनर्जी भारतातील नवीकरणीय ऊर्जा क्षेत्राला आकार देत आहे

पुणे, जुलै २०२४: पुण्‍यामध्‍ये एनर्जी अँड डिजिटल वर्ल्‍डचा प्रवेश दक्षिण व पूर्वेकडील यशस्‍वी मोहिमेनंतर एनर्जी अँड डिजिटल वर्ल्‍ड (ईडीडब्‍ल्‍यू) २०२४ मोहिम पश्चिम भागाकडे वळली आहे. बहु-शहरीय रोडशो पुण्‍यामध्‍ये पोहोचला, जेथे ऊर्जा सिस्‍टम्‍स, नवीकरणीय ऊर्जा एकीकरण आणि डिजिटल परिवर्तनाबाबत चर्चा करण्‍यात आली.
ईडीडब्‍ल्‍यू पुणे येथे विविध सत्रांमध्‍ये डिजिटल ट्रान्‍सफॉर्मर्स, एचव्‍ही स्विचगिअर ग्रिड इंटीग्रेशन, पॉवर ऑटोमेशन आणि ऊर्जा दर्जासाठी विविध तंत्रज्ञान अशा विषयांचा समावेश होता. या इव्‍हेण्‍टचा ग्राहकांना व सहयोगींना हिताची एनर्जीच्‍या ऊर्जा व डिजिटल सोल्‍यूशन्‍सबाबत सखोल माहिती मिळण्‍यास मदत करण्‍यावर मुख्‍य उद्देश होता.
२०५० पर्यंत, सध्‍याच्‍या २० टक्‍क्‍यांच्‍या तुलनेत जगातील निम्‍म्‍या ऊर्जा सिस्‍टम्‍समध्‍ये वीजेचा समावेश असेल. भारताने २०७० पर्यंत दीर्घकालीन निव्‍वळ-शून्‍य महत्त्वाकांक्षा स्‍थापित केली आहे, ज्‍यामध्‍ये २०३० पर्यंत संबंधित टप्‍प्‍यांचा समावेश आहे. ज्‍यानुसार आपली नवीकरणीय ऊर्जा स्‍थापित क्षमता ५०० गिगावॅटपर्यंत वाढवत निम्‍म्‍यापर्यंत ऊर्जा गरजेची पूर्तता करण्‍याचा मनसुबा आहे. ईडीडब्‍ल्‍यू सारखे इव्‍हेण्‍ट्स स्‍थानिक व जागतिक ऊर्जा आव्‍हानांसाठी सर्वसमावेशक आणि शाश्‍वत सोल्‍यूशन्‍स निर्माण करण्‍याप्रती चर्चा करण्‍यासोबत संकल्‍पनांची देवाणघेवाण करण्‍यासाठी व्‍यासपीठ देतात. 

भारतातील ७५ वर्षांच्‍या कार्यसंचालनांपासून हिताची एनर्जी ऊर्जा सिस्‍टमची स्थिरता, टिकाऊपणा व सुरक्षितता सुधारण्‍याप्रती, तसेच सामाजिक, पर्यावरणीय आणि‍ आर्थिक तत्त्वांमध्‍ये संतुलन राखण्‍याप्रती समर्पित आहे. ईडीडब्‍ल्‍यूच्‍या प्रमुख इव्‍हेण्‍ट्स देशाच्‍या कानाकोपऱ्यामधील युटिलिटीज, परिवहन व उद्योगामधील ग्राहकांना एकत्र आणतात. असे सहयोग प्रत्‍यक्ष आवश्‍यकता समजण्‍यास मदत करतात आणि सहयोगाने सोल्‍यूशन्‍स तयार करतात, परिणामत: भारतातील लाखो व्‍यक्‍तींचे जीवन सुधारण्‍यास मदत होते.