युनायटेड ब्रुअरीजने महाराष्ट्रात सादर केली क्वीनफिशर प्रीमिअम लागर बिअर

पुणे, १० जून २०२४ : हायनिकन (Heineken) कंपनीचा भाग असलेल्या युनायटेड ब्रुअरीज लिमिटेडतर्फे महाराष्ट्रात हाऊस ऑफ किंगफिशरकडून क्वीनफिशर प्रीमिअम लागर बिअर : द क्वीन ऑफ गुड टाइम्स सादर करण्यात आली. गोवा, आसाम आणि मेघालयमध्ये या बिअरला ग्राहकांचा सकारात्मक प्रतिसाद लाभला. या सकारात्मक प्रतिसादाने प्रोत्साहित होत, मैत्रिणींमधील घट्ट नाते साजरे करण्याचे हे औचित्य नव्या बाजारपेठांमध्ये विस्तारीत करण्यासाठी यूबीएलने पाऊल उचलले आहे.

क्वीनफिशरचे पॅकेजिंगमधून हे सर्वांना सोबत घेऊन जाण्याची भावना दर्शविण्यात आली आहे आणि भगिनीभावाच्या वृत्तीचा सोहळा आहे. यात तजेलदार जांभळ्या पार्श्वभूमीवर विविध महिलांचे तिमिरचित्र, तसेच आयकॉनिक मुकुटधारी वर मान असलेला किंगफिशर पक्षी आहे. आपल्या आयुष्यातील महिलांचा सन्मान करण्याचे हे प्रतीक आहे. किंगफिशरची मूल्ये हा क्वीनफिशरची संस्कृती असून या माध्यमातून अर्थपूर्ण आणि प्रामाणिक संभाषणाला सुरक्षित जागा उपलब्ध होते. समाजात स्त्रियांना अनेकदा तोंड द्यावे लागणाऱ्या पूर्वग्रहांची दखल या निमित्ताने घेण्यात आली आहे. 

युनायटेड ब्रुअरीज लिमिटेडचे सीएमओ विक्रम बहल म्हणाले, क्वीनफिशर हा सर्वसमावेशकता व महिलांमधील मैत्रीची न थांबवता येणारी शक्ती साजरी करण्याचा आमचा मार्ग आहे. आम्ही फक्त स्त्रीत्व साजरे करण्यासाठी नव्हे तर दररोजच्या नात्यांमध्ये त्या वापरत असलेल्या सीक्रेट सुपरपॉवरचा सन्मान करण्यासाठी आमचे कॅन उघडतो. महाराष्ट्र हा कायमच महिला आणि सर्वसमावेशक समाज घडविण्यात आघाडीवर राहिला आहे. आम्ही आमचा भगिनीभावाचा सोहळा विस्तारीत करत आहोत, आमच्यातल्या क्वीन्सचा जय असो, ज्या जेव्हा एकत्र चमकतात तेव्हा अधिक उजळतेने तळपतात.

सुरुवातील हे उत्पादनत मार्चमध्ये गोव्यात लाँच करण्यात आले. या लागर बिअरने ग्राहकांना मोठ्या प्रमाणात आकर्षित केले. या लाँच इव्हेंटच्या वेळी आयकॉनिक कॅलेंडरचेही प्रकाशन करण्यात आले. याला आता गॅलेंडर म्हणतात आणि यात महिलांच्या खऱ्या आयुष्यातील क्षण टिपण्यात आले आहेत. यांचे छायाचित्रण अवनी राय यांनी केले आहे. या प्रत्येक पानावर एक क्यूआर कोड आहे. हा स्कॅन केल्यावर कोपाल नैथानी दिग्दर्शित चित्रपटांच्या माध्यमातून भगिनीभावाचे खास क्षण दिसतात. queenfisher.in या वैशिष्ट्यपूर्ण मायक्रोसाइटच्या माध्यमातून लोक महिलांनी सांगितलेले भगिनीभावाचे हे जग अनुबवू शकतात आणि त्यांचे स्वतःचे वैयक्तिक गॅलेंडर तयार करू शकतात आणि इतरांशी शेअर करू शकतात.

५०० मि.लि.चे क्वीनफिशर प्रीमिअम लागर बिअर कॅन महाराष्ट्रभरातील आघाडीच्या आउटलेट्समध्ये उपलब्ध आहेत.

युनायटेड ब्रुअरीजबद्दल: 

बंगळुरूस्थित युनायटेड ब्रुअरीज लि. ही HEINEKEN ग्रुपचा भाग असून ती भारतातील सर्वांत मोठी बियर उत्पादक कंपनी आहे. ही कंपनी पॅकेज्ड पिण्याचे पाणी आणि सोडा, आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त बियर आणि बिगर अल्कोहोलिक पेयांचे उत्पादन आणि मार्केटिंग करते. तिच्या वैविध्यपूर्ण उत्पादन पोर्टफोलिओमध्ये किंगफिशर स्ट्राँग, किंगफिशर प्रीमियम, किंगफिशर अल्ट्रा, किंगफिशर अल्ट्रा मॅक्स, किंगफिशर अल्ट्रा विटबियर, किंगफिशर स्टॉर्म, Heineken®️, Heineken®️ सिल्व्हर, एमस्टेल, Heineken®️ 0.0.,  किंगफिशर प्रीमियम पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर आणि किंगफिशर सोडा ही उत्पादने आहेत.