– पर्यावरणपूरक प्रीपेड फॉरेक्स कॉर्पोरेट कार्ड भारतात प्रथमच पुनर्नवीनीकरण केलेल्या साहित्यापासून बनवले आहे
थॉमस कुक एंटरप्राइज-एफएक्स कार्ड चे फायदे:
•सुट्ट्या, विमान प्रवास आणि हॉटेल्सच्या मोबदल्यासह खर्चावर (पीओएस व्यवहारांवर) थॉमस कुक एज रिवॉर्ड पॉईंट्स
•भारतातील आंतरराष्ट्रीय विमानतळांवर विनामूल्य विश्रामगृह प्रवेश वैध*
•मोफत आंतरराष्ट्रीय सिम कार्ड-मोफत एटीएममधून पैसे काढणे*
•मोफत युवा कार्डः १,५०,००० + सवलती आणि १२५ + देशांमध्ये ६०,००० + ब्रँडवर ऑफर*
•ऑलपॉईंट एटीएमवर अधिभार-मुक्त पैसे काढणे*
•रु. ७ लाख ५० हजार रुपयांपर्यंतचे सर्वसमावेशक विमा संरक्षण.
•विनामूल्य कार्ड रिप्लेसमेंट*
•आपत्कालीन रोख मदत*
•कार्ड जारी केल्यावर क्रिसफ्लायर (सिंगापूर एअरलाइन्स) चे माइल्स कमवा
•युरोपमधील निवडक मॅकआर्थरग्लेन डिझायनर शॉपिंग आउटलेट्सवर विशेष ऑफर*
पुणे, २५ जून २०२४: भारत आता ३० अब्ज अमेरिकन डॉलर्सची व्यावसायिक प्रवास बाजारपेठ आहे आणि २०३० पर्यंत ती तिप्पट होण्याची अपेक्षा आहे. थॉमस कुकच्या फॉरेक्स प्रीपेड कार्ड डेटा प्रमाणे कॉर्पोरेट ट्रॅव्हलर हा ५० टक्क्यांपेक्षा जास्त हिस्सा असलेला सर्वात वेगाने वाढणारा विभाग आहे.
कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी कॉर्पोरेट्सना पाठिंबा देताना आपला बाजारातील वाटा वेगाने वाढवण्याच्या धोरणात, थॉमस कुक (इंडिया) लि. या भारतातील अग्रगण्य परकीय चलन सेवा देणाऱ्या कंपनीने एंटरप्राइज-एफएक्स हे एक पर्यावरणास अनुकूल प्रीपेड परकीय चलन कॉर्पोरेट कार्ड सुरू केले आहे.
व्हिसा आणि मास्टरकार्डच्या भागीदारीत, हे नाविन्यपूर्ण उत्पादन विचारपूर्वक तयार करण्यात आले आहे, जे संपूर्ण भारतीय कंपन्या, बहुराष्ट्रीय कंपन्या आणि एसएमई म्हणजेच छोटे-मध्यम स्वरूपातील उद्योगांमधील व्यावसायिक प्रवाशांना सक्षम करण्यासाठी प्रीमियम लाभांची श्रेणी प्रदान करते.
कंपनीच्या शाश्वत ध्येयांशी सुसंगत, थॉमस कुकच्या एंटरप्राइज-एफएक्स कार्ड मध्ये तीन प्रमुख घटक आहेतः 1) पुनर्वापर केलेल्या प्लास्टिकपासून तयार केलेले 2) ग्रीन पिनचे सुरक्षा वैशिष्ट्य (पेपरलेस) 3) थॉमस कुक कंपनी मार्फत विकल्या गेलेल्या प्रत्येक २५ व्या कार्डासाठी कंपनीच्या वतीने एक वृक्ष लावण्याची प्रतिज्ञा करतो; याव्यतिरिक्त ई-प्रमाणीकरण आणि जिओ-टॅगिंग. ह्या सर्वांचा परिणाम म्हणजे अंदाजे प्रति कार्ड ३० किलो कार्बन उत्सर्जनाची बचत. याचा अर्थ जवळपास एक लाख एंटरप्राइज-एफएक्स कार्डसाठी ३००० टन इतक्या प्रचंड कार्बन उत्सर्जनाची बचत; जी १२ लाखांहून अधिक झाडांच्या समान आहे.
थॉमस कुक (इंडिया) लिमिटेडचे एक्झिक्युटीव्ह व्हाईस प्रेसिडेंट (फॉरेन एक्सचेंज) दीपेश वर्मा म्हणाले, “जानेवारी-डिसेंबर २०२३ साठी साल-दरसाल १.५ पटीच्या लक्षणीय वाढीसह आमचा प्रीपेड कार्ड व्यवसाय आमच्या वाढीला चालना देतो आहे. भारताच्या शक्तिशाली व्यावसायिक प्रवास बाजारपेठेचा लाभ घेण्यासाठी धोरणात्मक पाऊल उचलत, मास्टरकार्ड आणि व्हिसाच्या सहकार्याने आमचे एंटरप्राइज-एफएक्स कार्ड हा आणखी एक नाविन्यपुर्ण उपक्रम जाहीर करताना मला आनंद होत आहे.”
एंटरप्राइज-एफएक्स कार्ड थॉमस कुक एज रिवॉर्ड पॉइंट्स, एक युथ कार्ड यासारख्या अनेक फायद्यांनी युक्त आहे. जिथे ३५ वर्षांखालील व्यावसायिक प्रवासी १२५ हून अधिक देशांमधील ब्रँडवर विशेष सूट, आपत्कालीन रोख सहाय्य आणि बरेच काही मिळवू शकतात!
अनुभव गुप्ता, सीनियर व्हाईस प्रेसिडेंट, बिझनेस डेव्हलपमेंट, साऊथ आशिया, मास्टरकार्ड म्हणाले, “मास्टरकार्ड फॉरेक्स कार्डसाठी थॉमस कुकबरोबरचे हे रोमांचक सहकार्य कार्डधारकांना सुरक्षित आणि व्यवहारांद्वारे त्यांची मनःशांती सुनिश्चित करताना सर्वोत्तम बक्षिसे देण्याची कंपनीची वचनबद्धता अधोरेखित करते. जगभरातील २००० हून अधिक हॉटेल्समध्ये एक रात्र विनामूल्य मुक्काम, कार भाड्याने देण्याचे प्रस्ताव आणि डायनिंग अनुभव यासारख्या रोमांचक ऑफर आणि फायद्यांच्या संपूर्ण श्रेणीने ते भरलेले आहे. शिवाय, नवीन कार्ड कॉर्पोरेट क्षेत्राला शाश्वत उत्पादने आणि उपाय स्वीकारण्याचे महत्त्व अधिक संवेदनशील करेल”.
व्हिसा इंडियाचे बिझनेस डेव्हलपमेंट – हेड सुजय रैना म्हणाले, “थॉमस कुकसोबत भागीदारी करून कॉर्पोरेट प्रवाशांसाठी त्यांची नवीन व्हिसा फॉरेक्स कार्ड सादर करण्यासाठी आम्ही उस्तुक आहोत, जी पुनःप्रक्रिया करता येणाऱ्या प्लास्टिकपासून तयार करण्यात आली आहे आणि ग्रीन पिनसारख्या वैशिष्ट्यांसह टिकाऊपणासाठी आमची वचनबद्धता दर्शवते. जागतिक नेतृत्व म्हणून, व्हिसा अतुलनीय आंतरराष्ट्रीय स्वीकृती उपलब्ध करून देतो.
त्यामुळे आमचे ग्राहक त्यांचे व्हिसा कार्ड ते कुठेही गेले तरी वापरू शकतात. मजबूत जोखीम यंत्रणा आणि चोवीस तास देयक सुरक्षिततेसह, आम्हाला विश्वास आहे की हे कार्ड कॉर्पोरेट प्रवाशांसाठी एक उत्तम पर्याय असेल. आम्ही आमच्या भागीदारांसोबत जबाबदारीने नाविन्यपूर्ण संशोधन करत असताना, या प्रस्तावामुळे कार्डधारकांना मिळणाऱ्या मोठ्या लाभांसह प्रवासाचा अनुभव वृद्धिंगत करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.