एनसीसी कम्बाईन्ड ऍन्युअल ट्रेनिंग कॅम्पमध्ये

पुणे : राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) कम्बाईन्ड ऍन्युअल ट्रेनिंग कॅम्पमध्ये पुणे विद्यार्थी गृहाच्या मुक्तांगण इंग्लिश स्कुल अँड ज्युनिअर कॉलेजच्या एनसीसी एअर विंग कॅडेट्सनी घवघवीत यश संपादन केले. सेनापती बापट रस्त्यावरील एनसीसीच्या मुख्यालयात आयोजित दहा दिवसांच्या निवासी शिबिरात नववीतील २१ कॅडेट्स सहभागी झाले होते.

शिबिरात झालेल्या विविध स्पर्धांत कॅडेट्सनी सहभाग घेत यश मिळवून शाळेचे नाव अभिमानाने उंचावले. सांघिक गटांतून प्रश्नमंजुषा स्पर्धेत विजेतेपद, ड्रिल स्पर्धेत उपविजेतेपद, सांस्कृतिक स्पर्धांत उपविजेतेपद पटकविले. राजवीर जाधवराव याला ‘बेस्ट कॅडेट जेडी’, तर वेदांती कदम हिला ‘बेस्ट कॅडेट जेडब्ल्यू’चा मान मिळाला.

यासह एनसीसी एअरविंग ग्रुप कोईमतूर यांच्या वतीने आयोजित ऑल इंडिया एनसीसी गर्ल्स ट्रेकिंग एक्स्पेडिशन २०२४ मध्ये कॅडेट इरा जोशी, कॅडेट आर्या चोरमुले, कॅडेट शर्वरी जगताप यांनी सहभाग घेतला. कॅडेट्ससाठी हा एक रोमांचकारी अनुभव होता. एअरविंगच्या संपूर्ण तुकडीला ऑफिसर श्रुती कांबळे यांनी प्रशिक्षण व मार्गदर्शन केले.

संस्थेचे सर्व संचालक व व्यवस्थापन, शाळेचे संचालक आनंद कुलकर्णी, मुख्याध्यापिका मिना राणे, पर्यवेक्षिका सुप्रिया देशकुलकर्णी व जयती नरवणे यांनी सर्व कॅडेट्स व ऑफिसर यांचे अभिनंदन केले.