भारतातील सर्वात मोठा ज्वेलरी रिटेल ब्रँड आणि टाटा समूहातील एक सदस्य, तनिष्कने सोन्याच्या किमतींमध्ये होत असलेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर आणि आपल्या ग्राहकांच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी सुरु केली आहे ‘गोल्ड एक्स्चेंज पॉलिसी’. शून्य वजावटीमार्फत ग्राहकांना सोन्याचे सर्वोत्तम मूल्य मिळवून देण्यासाठी या एक्स्चेंज पॉलिसीमध्ये जुन्या सोन्याला तनिष्कच्या सर्वात नवीन डिझाइन्ससह अपग्रेड करण्याची सुवर्णसंधी दिली जात आहे.
ग्राहककेंद्री ब्रँड तनिष्कने नेहमीच आपल्या सर्व कामांमध्ये ग्राहकांना सर्वाधिक प्राधान्य दिले आहे. तनिष्कची गोल्ड एक्स्चेंज पॉलिसी असा एक उपक्रम आहे ज्यामध्ये ग्राहकांचा विश्वास आणि त्यांच्यासोबतचे संबंध दृढ करण्यासाठी सर्वोत्तम मूल्य, अतुलनीय कारीगरी आणि पारदर्शक एक्स्चेंज प्रक्रिया उपलब्ध करवून देण्याप्रती ब्रँडची बांधिलकी दर्शवली गेली आहे. तनिष्कचा गोल्ड एक्स्चेंज प्रोग्राम आजच्या उतार-चढावांच्या बाजारपेठेमध्ये ग्राहकांसाठी विश्वास, पारदर्शकता आणि अतुलनीय मूल्यांचा दीपस्तंभ आहे. ही पॉलिसी सोन्याच्या वाढत्या किमतींच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांसाठी एक उपाय आहे, इतकेच नव्हे तर, त्यांनी ब्रँडवर दर्शविलेल्या विश्वासाचा सन्मान देखील आहे. दागिन्यांच्या एक्स्चेंजसाठी ज्यांनी तनिष्कला पसंती दिली आहे अशा ग्राहकांच्या सातत्याने वाढत्या समुदायामध्ये सहभागी होण्यासाठी ब्रँडने ग्राहकांना आमंत्रित केले आहे.
सोन्याच्या किमती सातत्याने वाढत आहेत, ग्राहक आपल्या जुन्या सोन्याचे जास्तीत जास्त मूल्य मिळवण्याचे मार्ग शोधात आहेत. कोणत्याही ज्वेलरकडून खरेदी केलेल्या जुन्या सोन्याचे एक्स्चेंज करून सोन्याचे सर्वोत्तम मूल्य मिळवण्यासाठी तनिष्कने आपल्या ग्राहकांना सक्षम बनवले आहे. तनिष्कने आपल्या ग्राहकांच्या वाढत्या, बदलत्या गरजा समजून घेत आपली एक्स्चेंज पॉलिसी प्रस्तुत केली आहे. यामध्ये भारतातील कोणत्याही ज्वेलरकडून खरेदी केलेल्या २२ आणि त्यापेक्षा जास्त कॅरेटच्या जुन्या सोन्यावर १००%* मूल्य मिळवून आपल्या ग्राहकांना सर्वोत्तम मूल्य मिळवून