पुणे, जून 2024 : आघाडीची तंत्रज्ञान कंपनी असलेल्या लेनोव्हो ने गेमिंग ग्राहकांसाठी एंड – टू- एंड कस्टमायझेशनचा पर्याय देत डेस्कटॉप कॉम्प्युटर्समध्ये एक नवीन मानक स्थापन केले आहे. ब्रँड तर्फे गेमिंग डेस्कटॉपवर सर्व स्तरावरील सानुकूलता प्रदान करत आहे,ज्यामुळे वापरकर्त्यांना त्यांच्या विशिष्ट गरजा आणि प्राधान्यानुसार संगणकीय अनुभव घेता येईल.
ग्राहकांना लिजन आणि एलओक्यू गेमिंग,डेस्कटॉप्स अपग्रेड करता येतील.वापरकर्त्यांना विविध प्रकारचे कस्टमायझेशन पर्याय उपलब्ध आहेत.ते खालील प्रमाणे :
- सुधारित कार्यक्षमतेसह नवीनतम इंटेल आय7 14 जनरेशन पर्यंत प्रोसेसर अपग्रेड
- सुधारित मल्टीटास्किंग क्षमतेसाठी 32 जीबीपर्यंत मेमरी अपग्रेड
- सुधारित गेमिंग आणि ग्राफिक डिझाईन अनुभवासाठी ताकदवर एनविडिया आरटीएक्स 4060 टीआय पर्यंत ग्राफिक कार्ड अपग्रेड
स्टोरेज पर्याय (एसएसडी + एचडीडी), वायफाय कनेक्टिव्हिटी,सिस्टिममध्ये चांगले वातानुकुलिकरण आणि एअरफ्लो यासारखे इतर अपग्रेड करण्यायोग्य घटक.
लेनोव्होचे तुमच्यासाठी,तुम्ही कॉन्फिगर केलेले कस्टमायझेशन पर्याय ग्राहकांना कामासाठी गेमिंग किंवा क्रिएटिव्ह प्रकल्पांसाठी त्यांच्या गरजा पूर्ण करणारी डेस्कटॉप प्रणाली तयार करण्यास सक्षम करते आणि स्वत:चा गेमिंग पीसी तयार करण्यासाठी अवघे काही मिनिटे लागतात.
अलीकडील स्टॅटिस्टा अहवालानुसार भारतात डेस्कटॉप पीसी बाजारपेठेला मागणी वाढत आहे,कारण अधिक व्यवसाय आणि व्यक्ती विश्वासार्ह आणि परवडणाऱ्या कॉम्पिंटिंग सोल्युशन्सची मागणी करत आहेत.याव्यतिरिक्त कस्टमायजेबल पीसीची मागणी देखील वाढत आहे.बिल्ट ऑन ऑर्डर डेस्कटॉपमुळे ग्राहकांना त्यांच्या संगणकामध्ये विशिष्ट कॉम्पोनंटस आणि वैशिष्टये निवडता येतात,ज्यामुळे त्यांच्या नेमक्या गरजा पूर्ण होण्यास मदत होते.
याबाबत बोलताना लेनोव्हो इंडियाचे संचालक व कॅटेगरी हेड आशिष सिक्का म्हणाले की,सध्या ग्राहकांच्या गरजा वैविध्यपूर्ण असल्याने प्रत्येक वापरकर्त्याला त्यांच्या संगणकीय अनुभवाबाबतीत वेगवेगळ्या गरजा आणि प्राधान्य असतात.आमच्या व्यापक कस्टमायजेशन पर्यायांसह वापरकर्ते त्यांच्या गरजेनुसार उच्च कार्यक्षमता असलेली प्रणाली वापरू शकतात आणि डेस्कटॉपमध्ये वापरले जाणारे कंपोनंटसचे प्रकार आणि गुणवत्तेवर नियंत्रण ठेऊ शकतात.
या ट्रेंडला प्रोत्साहन देण्यासाठी मर्यादित कालावधीसाठी ऑफर सादर करण्यात आली असून ग्राहक आपला लेनोव्हो डेस्कटॉप कस्टमाईज्ड करताना ग्राफिक कार्ड अपग्रेडवर 30 टक्के सवलत मिळवू शकतात.
लेनोव्हो कस्टम मेड डेस्कटॉप्स आता संकेतस्थळावर व निवडक किरकोळ विक्रेत्यांमार्फत खरेदीसाठी उपलब्ध आहेत.ग्राहकांना त्यांचे कस्टमाईज्ड डेस्कटॉप ऑर्डर केल्यापासून चार आठवड्यांच्या कालावधीत मिळू शकते.अधिक माहितीसाठी https://www.lenovo.com/in/en/d/customise-to-order/ या संकेतस्थळाला भेट द्या.