बीएमडब्ल्यूची ऑल-न्‍यू बीएमडब्ल्यू आर १३०० जीएस भारतात लाँच  

पुणे, जून २०२४ : बीएमडब्ल्यू  मोटोर्राड इंडियाने इंडियामध्‍ये ऑल-न्‍यू बीएमडब्ल्यू आर १३०० जीएस  लाँच केली आहे. ही अॅडवेन्‍चर मोटरसायकल कम्‍प्‍लीटली बिल्‍ट-अप युनिट (CBU) म्‍हणून उपलब्‍ध असेल आणि ह्या बाईकच्या  विक्रीला   जून २०२४ च्‍या अखेरपर्यंत सुरूवात होईल. ऑल-न्‍यू बीएमडब्ल्यू आर १३०० जीएस ची इंट्रोडक्‍टरी एक्‍स-शोरूम किंमत रु. २०,९५,००० इतकी आहे. बीएमडब्ल्यू आर १३०० जीएस  लाइट व्‍हाइट मेटलिकमध्‍ये बेस, पर्यायी स्‍टाइल्‍स – ट्रिपल ब्‍लॅक ब्‍लॅकस्‍टॉर्म मेटलिक पेंटवर्कमध्‍ये उपलब्‍ध आहे; बीएमडब्ल्यू ग्रुप इंडियाचे अध्य्क्ष श्री.विक्रम पावाह म्‍हणाले, ”बीएमडब्ल्यू मोटोर्राडनेआर ८० जी एस  सह चार दशकांपूर्वी टूरिंग एण्‍ड्युरोजचा नवीन विभाग स्‍थापित केला. आणि तेव्‍हापासून बॉक्‍सर इंजिन असलेली बीएमडब्ल्यू जीएस  स्‍पर्धात्‍मक क्षेत्रात अग्रस्थानी राहिली आहे. ऑल-न्‍यू बीएमडब्ल्यू आर १३०० जीएससह, बीएमडब्ल्यू   मोटोर्राडने जीएस ला अधिक सर्वोत्तम करण्‍यावर लक्ष केंद्रित केले आहे. या मोटरसायकलमध्‍ये शक्‍ती, आरामदायीपणा व गतीशीलतेचे परिपूर्ण संयोजन आहे, ज्‍यामुळे ही कोणत्‍याही प्रदेशात राइडिंगसाठी अनुकूल मोटरसायकल आहे. वैविध्‍यता आणि आकर्षकतेसह ऑल-न्‍यू बीएमडब्ल्यू आर १३०० जीएस उच्‍च अपेक्षांच्‍या देखील पुढे जाईल.

ऑल-न्‍यू बीएमडब्ल्यू आर १३०० जीएस मध्‍ये पूर्णत: नवीन डिझाइन आहे, जी पारंपारिक जीएस  आयकॉन्‍सवर आधारित आहे, तसेच त्‍यामधून अत्‍यंत सुसंगता आणि कमी झालेले वजन दिसून येते. मोठ्या प्रमाणात फ्लॅटर टँक रॅम्‍पसह फ्लायलाइनमधून या मोटरसायकलची डायनॅमिक, हलकी-फुलकी व लक्षवेधक आकर्षकता दिसून येते. अॅल्‍युमिनिअम फ्यूएल टँकवर अपहोल्‍स्‍टरी सेंटर कव्‍हर कायम राखण्‍यासह सीटलाजीएस  विशिष्‍ट एण्‍ड्युरो-स्‍टाइल सिल्‍हूट देण्‍यात आले आहे. लक्षवेधक ब्रेकसह डिझाइनमध्‍ये नवीन एलईडी मॅट्रिक्‍स हेडलाइट्स आहेत. सिंगल प्रोजेक्‍टर युनिटमध्‍ये हाय बीम व लो बीमचे एकीकरण जीएस हेडलॅम्‍पच्‍या प्रतिष्ठित पृष्‍ठभागाला नवीन रूप देते. सर्व पर्यायी स्‍टाइल्‍समध्‍ये ‘हेडलाइट प्रो’ उपलब्‍ध असण्‍यासह मॅट्रिक्‍स फुल एलईडी  हेडलॅम्‍पची बीम बँकिंग पोझीशननुसार बेंड होते. . स्‍पोर्टी, स्लिमलाइन पॅसेंटर सीट, तसेच कार्यक्षम स्‍पोर्टस् ग्रॅब हँडल ब्रिज मागील बाजूस काहीसे वरील बाजूने सीट आकार देत असले तरी प्रवासीला आरामदायी सीटिंगची खात्री देते. मुलभूत व्‍हर्जनमध्‍ये प्रमाणित राइडरच्‍या सीटची उंची 850 मिमी आहे आणि त्‍यामध्‍ये द्वि-स्‍तरीय कव्‍हर बसवण्‍यात आले आहे, जे फ्यूएल फिलर कॅपपासून पॅसेंजर सीटपर्यंत हलक्‍या ग्रे टेक्‍स्‍चरमध्‍ये आहे.ऑल-न्‍यू बीएमडब्ल्यू

आर १३०० जीएस मध्‍ये प्रमाणित म्‍हणून इक्विपमेंट वैशिष्‍ट्य कनेक्‍टीव्‍हीटी, तसेच ६ . ५ -इंच फुल-कलर टीएफटी  स्क्रिन आहे. एकीकृत कार्यसंचालनासह स्‍टॅण्‍डर्ड बीएमडब्ल्यू मोटोर्राड मल्‍टी-कंट्रोलरशी संलग्‍न राहत ही मोटरसायकल राइडरला जलदपणे वेईकल व कनेक्‍टीव्‍हीटी फंक्‍शन्‍स उपलब्‍ध करून देते. प्रमाणित कम्‍फर्ट पॅकेजमध्‍ये सेंटर स्‍टॅण्‍ड, अॅडजस्‍टेबल विंडस्क्रिनसह हाय विंडशील्‍ड, कॉकपीट ट्रिम व विंड डिफ्लेक्‍टर, पॅसेंजर किटसह कम्‍फर्ट पॅसेंजर सीट, कम्‍फर्ट पॅसेंजर रेस्‍ट आणि लगेज कॅरियर आहे. टूरिंग पॅकेज फक्‍त ऑप्‍शन स्‍टाइल्‍ससह उपलब्‍ध आहे, ज्‍यामध्‍ये सेंट्रल लॉकिंग, प्रीपरेशन फॉर नेव्हिगेशन, क्रोम-प्‍लेटेड मॅनिफोल्‍ड, लेफ्ट व राइड केसहोल्‍डर, हँड प्रोटेक्‍टर एक्‍स्‍टेंशन आणि टॉपकेस होल्‍डर आहे.