BIG NEWS : बॉलिवूड अभिनेत्रीनं संपवलं आयुष्य; पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सडला मृतदेह

मुंबई : (BIG NEWS) बॉलिवूडमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेत्रीनं आत्महत्या केली असून मुंबई येथील राहत्या घरात पंख्याला लटकलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळून आला आहे. नूर मालाबिका असं अभिनेत्रीचं नाव असून तिनं अभिनेत्री काजोलच्या ‘द ट्रायल’ या वेब सीरिजमध्ये काम केलं होतं. 6 जून रोजी मुंबईतील लोखंडवाला येथील अपार्टमेंटमध्ये आत्महत्या करत आयुष्य संपवलं. 37 वर्षांच्या अभिनेत्रीच्या आत्महत्येनं इंडस्ट्रीत चांगलीच खळबळ उडाली आहे. तिच्या आत्महत्येचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.

मिड डेच्या रिपोर्टनुसार, शेजाऱ्यांना अभिनेत्रीच्या खोलीतून दुर्गंधी येऊ लागल्यानं त्यांनी तात्काळ त्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी अभिनेत्री तिच्या घरात पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आली. तिचा मृतदेह सडला होता. मुंबईतील बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या ममदानी हेल्थ अँड एज्युकेशन ट्रस्ट NGOनं अभिनेत्रीवर रविवारी अंत्यसंस्कार केले.

एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, आम्ही अभिनेत्रीच्या कुटुंबियांशी बातचीत केली. एक आठवड्यांआधीच ते गावी परत गेले होते. या प्रकरणात पोलीस तपास करत आहेत. अभिनेत्रीचा मित्र आलोकनाथ पाठक यानं सांगितलं की, “मला ही माहिती मिळाल्यानंतर धक्का बसला. नूरला मी अनेक वर्षांपासून ओळखतोय. आम्ही अनेक मालिका आणि सिनेमात काम केलं होतं. तिची फॅमिली मागील आठवड्यात मुंबईत आली होती”. अभिनेत्री अनेक दिवस डिप्रेशनमध्ये होती असं म्हटलं जात आहे. पोलीस याचा खोलात तपास करत आहेत.