पुणे, ११ जून २०२४ – कार्स24 ही भारतातील आघाडीची ऑटोटेक कंपनी कार्स24 फायनान्शियल सर्व्हिसेस प्रा. लि. (सीएफएसपीएल) या आपल्या वित्तपुरवठा विभागाच्या माध्यमातून महत्त्वाचा टप्पा साजरा करत आहे. पुणे शहरात लाँच केल्यापासूनच सीएफएसपीएलने ३३६ कोटी रुपयांच्या कार कर्जाचे वितरण केले आहे. कंपनीने पुण्यात कार वित्तपुरवठा क्षेत्रात लक्षणीय ३० टक्के वार्षिक विकास साध्य केला आहे. हा विकास पुण्यातील कार वित्त पुरवठा क्षेत्राचा वेगाने विकसित होत असल्याचे दर्शवणारा आहे. त्याचप्रमाणे यातून कार खरेदी ही केवळ चैनीची बाब राहिली नसून आवश्यकता झाल्याचे त्यातून दिसून येत आहे. ग्राहकांना वाजवी किंमतीत कार मिळावी आणि सहजपणे कार खरेदी करता यावी यासाठी सीएफएसपीएल प्रयत्नशील आहे.
पुण्यातील वाहतुकीचे बदलते पर्याय – पुण्यातील वाहतुकीच्या पर्यायांना असलेली पसंती बदलत असल्याचे दिसून येत आहे. शहरातील वेगाने विकसित होत असलेल्या पायाभूत सुविधा आणि आर्थिक विकासामुळे वैयक्तिक वाहन खरेदीला जास्त पसंती दिली जात आहे. वाहतुकीच्या वैयक्तिक पर्यायांना मिळत असलेल्या मागणीमुळे सोयीस्कर वित्तपुरवठा सुविधांना असलेली मागणीही वाढत आहे.
तरुणाई आणि मिलेनियल्समध्ये कार खरेदीसाठी वित्तपुरवठा घेण्याला पसंती मिळत असल्याचा लक्षणीय ट्रेंड अलीकडे दिसून येत आहे. कार खरेदीसाठी कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचे सरासरी वय ३४ वर्ष असून तरुण नोकरदार आणि कुटुंबांमध्ये वैयक्तिक वाहन खरेदीला वाढती पसंती मिळत आहे. ग्राहकांचा हा वर्ग कारकडे प्रवासाचे आवश्यक आणि सुरक्षित साधन म्हणून पाहात असून रोजचा प्रवास सुखकर आणि स्वतंत्रपणे करण्यासाठी त्यांना कार जवळ असणे महत्त्वाचे वाटत आहे. महत्त्वाकांक्षी तरुण ग्राहक कार बाजारपेठेला नवा आकार देत असून सोयीस्करपणा, सुरक्षा आणि कार्यक्षमतेला त्यांचे प्राधान्य आहे. ग्राहकांची प्री- ओन्ड वाहनांना पसंती असून कार खरेदी करण्यासाठी कर्ज घेण्याचा पर्याय त्यांना स्मार्ट आणि सोपा वाटत आहे. यावरून तरुण पिढीची स्वावलंबी राहाण्याची आकांक्षा आणि पुण्यातल्या रस्त्यांवरून प्रवास करण्यासाठी सुधारित वाहन हवे असण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
पुण्यात वित्त पुरवठ्यासाठी लोकप्रिय असलेल्या कार्स – पुण्यात टिकाऊ आणि व्यवहार्य वाहनांना जास्त मागणी असून ते वॅगनआर, स्विफ्ट आणि ह्युंदाई- ग्रँड आयटेन अशा मॉडेल्सच्या लोकप्रियतेमधून दिसून आले आहे. या कार्स त्यांचा वाजवीपणा, कार्यक्षमता आणि सर्वसमावेश वैशिष्ट्यांसाठी लोकप्रिय आहेत.
स्पोर्टी डिझाइन आणि सोपी हाताळणी यासाठी स्विफ्ट लोकप्रिय असून विशेषतः तरुण वर्ग आणि पहिल्यांदाच कार खरेदी करत असलेल्या ग्राहकांची त्याला पसंती आहे. दरम्यान ह्युंदाई- ग्रँड आय टेन तिचे आटोपशीर डिझाइन, आधुनिक प्रकारची कनेक्टिव्हिटी यांमुळे शहरी प्रवासांमध्ये लोकप्रिय आहे. पुण्यातील ग्राहक वाजवीपणा, इंधन कार्यक्षमता, सोयीस्कर डिझाइनमुळे हॅचबॅककडे वळत असून या गाड्या पुण्यातील ट्रॅफिक आणि पार्किंगच्या अरूंद जागांमध्ये वापरण्यासाठी आदर्श आहेत. त्यांचे वैविध्य, भरपूर कार्गो जागा आणि आधुनिक तंत्रज्ञान यामुळे ग्राहकांचा विस्तृत वर्ग त्याकडे आकर्शित होत असून त्यात प्रामुख्याने तरुण व्यावसायिक आणि कुटुंबांचा समावेश आहे. देखभालीचा कमी खर्च, रिसेलला येणारी चांगली किंमत यामुळे या गाड्यांचे मूल्य अधिक वाढते. या वैशिष्ट्यांमुळे तसेच किंमतीचे पूर्ण मूल्य मिळत असल्यामुळे पुण्यातील बहुतांश ग्राहकांची हॅचबॅकला पसंती वाढत आहे.
कार्स24 सह- संस्थापक गजेंद्र जान्गिद म्हणाले, ‘पुण्यात कारखरेदीसाठी वित्तपुरवठ्याला मिळत असलेली पसंती कार खरेदी सुलभ आणि वाजवी झाल्याचा ट्रेंड दर्शवणारी आहे. हा ट्रेंड ग्राहकांची बदलती मानसिकता तसेच वैयक्तिक वाहन खरेदी सोयीस्करपणे करण्यावर असलेला भर यांचे निदर्शक आहे. सर्व ग्राहकांसाठी कार खरेदीचा अनुभव सुरळीत, विश्वासार्ग आणि किफायतशीर असावा यावर आम्ही लक्ष केंद्रित केले असून पर्यायाने वाहन क्षेत्रातील या लक्षणीय बदलाला आम्ही चालना देत आहोत.’
पुण्यातील ५९ टक्के ग्राहकांची कार खरेदी करताना वित्त पुरवठा घेण्यास पसंती
कार्स24 तर्फे वैविध्यपूर्ण गरजांसाठी वित्तपुरवठ्याचे विविध पर्याय उपलब्ध करण्यात आल्याने कार खरेदी सोपी आणि सहज करणं शक्य झालं आहे. कंपनीतर्फे ६० महिन्यांसाठी १२,००० रुपये सरासरी ईएमआय आणि १५.२ टक्क्यांचा सरासरी व्याजदर दिला जातो.
पुण्यातील ५९ टक्के ग्राहक कार खरेदीसाठी वित्तपुरवठ्याचा आधार घेत असून त्यावरून वैयक्तिक वाहन खरेदीची वाढती आकांक्षा दिसून येत आहे. राष्ट्रीय पातळीवर ६३ टक्के लोक त्यांच्या कारसाठी कर्ज घेतात. परतफेडीचे विविध पर्याय उपलब्ध करत कार्स24 ग्राहकांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीनुसार कर्ज घेण्यास सक्षम केले आहे. बहुतेक कर्ज काही तासांत संमत केली जात असल्यामुळे कार खरेदीची प्रक्रिया सोपी होते. देशभरात कार्स24 कडे रोज ६२० कर्ज अर्ज येतात.
परतफेडीचे लवचिक पर्याय उपलब्ध करत आणि बहुतेक कर्जांवर काही तासांत प्रक्रिया करत कार्स24 ने कार खरेदीची प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर सोपी केली आहे.
भारतात १८० शहरांत कार्यरत असलेली कार्स24 भारतातील वैयक्तिक वाहतुक सुविधा क्षेत्राच्या भविष्याला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे.