वी एसओसी २ टाईप II अटेस्टेशन मिळवणारी या उद्योगक्षेत्रातील पहिली कंपनी बनली; ग्राहकांचा विश्वास आणि डेटा सुरक्षितता अबाधित राखण्याप्रती वचनबद्धता अधोरेखित केली

आघाडीची टेलिकॉम ऑपरेटर वोडाफोन आयडियाने एसओसी२ टाईप II अटेस्टेशन मिळवले असल्याची घोषणा आज करण्यात आली. एसओसी २ टाईप II अटेस्टेशन यशस्वीपणे पूर्ण करणारी वी ही भारतातील एकमेव टेलिकॉम ऑपरेटर आहे. डेटा सुरक्षितता आणि ग्राहकांची संवेदनशील माहिती, गोपनीयता अबाधित राखून डिस्ट्रिब्युटेड डिनायल-ऑफ-सर्व्हिस हल्ले कमी करण्याप्रती वी ची वचनबद्धता यामुळे अधोरेखित झाली आहे. 

नोंदणीकृत स्वतंत्र सीपीए असोसिएशन ऑफ इंटरनॅशनल सर्टिफाइड प्रोफेशनल अकाउंटंट्सने केलेल्या काटेकोर मूल्यांकन प्रक्रियेत यशस्वी ठरल्यानंतर देण्यात आलेली ही मान्यता ग्राहकांच्या माहितीचे व्यवस्थापन करण्यासाठी एसओसी २ “ट्रस्ट सर्व्हिस” वर आधारित आहे. यासाठी सुरक्षितता, उपलब्धता, प्रक्रियेची अखंडता, गोपनीयता आणि प्रायव्हसी या प्रमुख निकषांनुसार हे मूल्यांकन केले जाते. या अटेस्टेशनमधून कंपनीची महत्त्वपूर्ण सिक्युरिटी धोरणे अंमलात आणण्याची क्षमता दिसून येते तसेच प्रदीर्घ कालावधीत त्याचे अनुपालन केले जात असल्याचे सिद्ध होते.

एसओसी२ टाईप II ऑडिटमध्ये सुनिश्चित झाले आहे की, वी चे इंटर्नल कंट्रोल्स, धोरणे आणि प्रक्रिया यामध्ये काटेकोर सुरक्षा व संचालनात्मक मानके यांचे पालन केले जाते. याचा अर्थ असा की, वी चे डिझाईन आणि सिक्युरिटी कंट्रोल्सचा संचालनात्मक प्रभाव खूप मजबूत असून डीडीओएस प्रोटेक्शनचा स्तर सर्वात उच्च आहे. सुरक्षेला उद्भवणारा कोणताही धोका ही कंपनी त्वरित ओळखू शकते आणि त्यावर प्रतिक्रिया देऊ शकते, त्यामुळे वी ही सर्व व्यवसायांसाठी विश्वसनीय सेवा पुरवठादार आहे.

वी ला २०२२ साली एसओसी२ टाईप १ अटेस्टेशन मिळाले. वी कडून ग्राहकांना दिल्या जात असलेल्या सेवा संपूर्णपणे सुरक्षित आणि कम्प्लायंट असल्याचे यामुळे सिद्ध झाले. आता एसओसी २ टाईप २ अटेस्टेशन मिळाल्याने सिद्ध झाले आहे की, कंपनी ६ ते १२ महिन्यांच्या कालावधीत सुरक्षा प्रक्रियांचे व उपायांचे सातत्याने पालन करत आहे.

वी चे सीटीएसओ माथन काशीलिंगम यांनी सांगितले, “आमच्या ग्राहकांचा आमच्यावर विश्वास आहे की त्यांची सर्वात संवेदनशील व गोपनीय माहिती आमच्याकडे सुरक्षित आहे. या अटेस्टेशनमध्ये सिद्ध झाले आहे की, आमच्या सुरक्षा उपाययोजना श्रेणीतील सर्वोत्तम मानकांचे पालन करतात, त्यामुळे आमच्या ग्राहकांमध्ये त्यांची माहिती सुरक्षित हातांमध्ये असल्याबद्दलचा विश्वास अधिक मजबूत होईल.”

विस्टा इन्फोसेकचे फाउंडर आणि संचालक श्री नरेंद्र साहू म्हणाले, “एसओसी २ अनुपालनातून नवीन सुरक्षा प्रथांचे पालन करण्याची तत्परता आणि सतत बदलत असलेल्या धोक्यांना ओळखून तात्काळ कार्यवाही करण्याची क्षमता दिसून येते. वी टीमचा सहयोग आणि समर्पित वृत्ती अतिशय कौतुकास्पद आहे.”

अखंडता आणि सुरक्षा यांच्या सर्वोच्च मानकांचे पालन करत नाविन्यपूर्ण सेवासुविधा, उत्पादने उपलब्ध करवून देण्याचे मिशन वी ने कायम राखले आहे. आजच्या डिजिटल युगात डेटा सुरक्षा खूप महत्त्वाची आहे. वी आपले सिक्युरिटी पोश्चर व ग्राहकांच्या डेटाचे विश्वसनीय कस्टोडियनम्हून आपले स्थान मजबूत करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे.