ऑफिस स्पेस सोल्युशन्स लिमिटेडचा आयपीओ २२ मे २०२४ रोजी खुला होणार

मुंबई, १६ मे २०२४: सीबीआरई अहवालानुसार भारतातील सर्वात मोठी फ्लेक्सिबल वर्कस्पेस सोल्युशन्स कंपनी, ऑफिस स्पेस सोल्युशन्स लिमिटेडने आपला आयपीओ २२ मे २०२४ रोजी खुला करण्याचे ठरवले आहे. त्याच्या एक दिवस आधी २१ मे २०२४ रोजी अँकर गुंतवणूकदारांना बोली लावता येतील. बोली/ऑफर २७ मे २०२४ रोजी बंद होईल.

प्राईस बँड ३६४ रुपये ते ३८३ रुपये निश्चित करण्यात आला आहे. कमीत कमी ३९ इक्विटी शेयर्ससाठी बोली लावता येईल, त्यापेक्षा जास्त शेयर्स हवे असल्यास ३९ च्या पटीत बोली लावावी लागेल.

या ऑफरमध्ये १२८०.०० मिलियन रुपयांपर्यंतचे (.) नव्याने जारी करण्यात आलेल्या आणि १२२९५६९९ पर्यंत विक्रीसाठी प्रस्तुत करण्यात आलेल्या इक्विटी शेयर्सचा समावेश आहे. यामध्ये पीक एक्सव्ही पार्टनर्स इन्वेस्ट्मेन्ट्स व्ही (आधीची एससीआय इन्वेस्ट्मेन्ट्स व्ही) यांच्याकडून ६६१५५८६ पर्यंत एकूण (.) मिलियन रुपयांपर्यंतच्या, बिस्क लिमिटेडकडून (.) मिलियन रुपयांपर्यंतच्या ५५९४९१२ पर्यंत आणि लिंक इन्व्हेस्टमेंट ट्रस्टकडून (.) मिलियन रुपयांपर्यंतच्या ८५२०१ पर्यंत इक्विटी शेयर्सचा समावेश आहे. या ऑफरमध्ये आमच्या कंपनीच्या पोस्ट-ऑफर पेड अप इक्विटी शेयर कॅपिटलपैकी (.)% चा समावेश असेल.

या ऑफरमध्ये  २०.०० मिलियन रुपयांपर्यंतचे (.) इक्विटी शेयर्स पात्र कर्मचाऱ्यांसाठी सबस्क्रिप्शनसाठी राखीव ठेवण्यात येतील. कर्मचाऱ्यांसाठी राखीव ठेवलेला भाग वगळता उर्वरित भागाला “नेट ऑफर” असे संबोधले जाईल. ऑफर आणि नेट ऑफरमध्ये कंपनीच्या पोस्ट-ऑफर पेड-अप इक्विटी शेयर कॅपिटलचे अनुक्रमे (.)% आणि (.)% प्रमाण असेल. बुक रनिंग लीड मॅनेजर्सच्या सल्ल्याने कंपनी कर्मचाऱ्यांसाठी राखीव ठेवलेल्या भागांतर्गत बोली लावणाऱ्या पात्र कर्मचाऱ्यांना (.)% पर्यंत (प्रत्येक इक्विटी शेयरसाठी (.) रुपये) सूट देईल.

या आयपीओमधून जे भांडवल उभे राहील त्याचा वापर भांडवली खर्चासाठी करण्यात येईल, त्यामध्ये नवीन सेंटर्स स्थापन करणे, कंपनीच्या खेळत्या भांडवल गरजा पूर्ण करणे आणि सर्वसाधारण कॉर्पोरेट कामे यांचा समावेश आहे.

ही ऑफर सिक्युरिटीज काँट्रॅक्टस (नियंत्रण) अधिनियम, 1957 च्या नियम 19 (2) (बी) अनुसार, संशोधित (“एससीआरआर”), सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) (भांडवल व प्रकटीकरण आवश्यकता जारी करणे) नियम 31 नुसार (“सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्स”) सेबी आयसीडीआर नियम 6(2) ला अनुसरून बुक बिल्डिंग प्रक्रियेमार्फत देण्यात येत आहे आणि या ऑफरमधील कमीत कमी 75% भाग क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्सना (“क्यूआयबी”) (“क्यूआयबी पोर्शन”) प्रमाणित आधारावर विभागून दिले जातील.  यासाठी लागू असलेल्या अटीनुसार कंपनी आणि विक्रेते शेयरहोल्डर्स बुक रनिंग लीड मॅनेजर्सच्या सल्ल्याने क्यूआयबी भागांपैकी 60% पर्यंत भाग अँकर गुंतवणूकदारांना विवेकानुसार आधारावर वाटून देतील. अँकर इन्व्हेस्टर पोर्शनपैकी कमीत कमी एक तृतीयांश भाग देशांतर्गत म्युच्युअल फंड्ससाठी राखून ठेवला जाईल, यासाठी सेबी आयसीडीआर नियमांप्रमाणे अँकर इन्व्हेस्टर पोर्शनच्या वर वैध बोली देशांतर्गत म्युच्युअल फंड्सकडून प्राप्त होणे आवश्यक आहे. अंडर-सब्स्क्रिप्शन किंवा अँकर इन्व्हेस्टर पोर्शनमध्ये वाटप न झाल्यास उरलेले इक्विटी शेयर्स उर्वरित क्यूआयबी पोर्शनमध्ये वळते केले जातील. नेट क्यूआयबी पोर्शनपैकी 5% हे प्रपोर्शनेट बेसिसवर फक्त म्युच्युअल फंड्ससाठी उपलब्ध करवून दिले जातील आणि उरलेला नेट क्यूआयबी पोर्शन हे सर्व क्यूआयबी बोली लावणाऱ्यांसाठी (अँकर गुंतवणूकदारांव्यतिरिक्त) प्रपोर्शनेट बेसिसवर उपलब्ध करवून दिले जातील आणि यामध्ये म्युच्युअल फंड्सचा देखील समावेश असेल. यासाठी इश्यू किमतीइतके किंवा त्यापेक्षा जास्त वैध बोली येणे आवश्यक आहे. नेट ऑफरचा कमीत कमी 15% भाग नॉन-इन्स्टिट्यूशनल खरेदीदारांना सेबी आयसीडीआर नियमांनुसार, प्रपोर्शनेट बेसिसवर वाटपासाठी पुढीलप्रमाणे उपलब्ध करवून दिला जाईल: नॉन-इन्स्टिट्यूशनल गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असलेल्या भागांपैकी एक-तृतीयांश भाग 2,००,००० रुपयांपेक्षा जास्त आणि 1०,००,००० रुपयांपर्यंत ऍप्लिकेशन आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखून ठेवला जाईल. नॉन-इन्स्टिट्यूशनल गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असलेल्या भागांपैकी दोन-तृतीयांश भाग 1०,००,००० रुपयांपेक्षा जास्त ऍप्लिकेशन आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखून ठेवला जाईल, यासाठी अशाप्रकारच्या कोणत्याही उप-विभागांमध्ये सबस्क्राईब न करण्यात आलेला भाग नॉन-इन्स्टिट्यूशनल गुंतवणूकदारांच्या दुसऱ्या उप-विभागात वाटून दिला जाईल, यासाठी ऑफर किमतीइतक्या किंवा त्यापेक्षा जास्त पात्र बोली येणे आवश्यक आहे आणि सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्सनुसार कमीत कमी 10% नेट ऑफर रिटेल इंडिविज्युअल बिडर्सना वाटून देण्यासाठी उपलब्ध राहील, यासाठी ऑफर प्राईसइतक्या किंवा त्यापेक्षा जास्त किमतीच्या पात्र बोली येणे आवश्यक आहे. सर्व बिडर्स (अँकर इन्वेस्टर्सव्यतिरिक्त) अप्लिकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक्ड अमाऊंट (“एएसबीए”) प्रक्रियेमार्फत या इश्यूमध्ये सहभागी होतील यासाठी त्यांना त्यांच्या खात्यांची (युपीआय यंत्रणा वापरणाऱ्या बिडर्ससाठी युपीआय आयडी) माहिती देणे आवश्यक आहे ज्यामध्ये जे सेल्फ सर्टिफाईड सिंडिकेट बँकांकडून (“एससीएसबी”) किंवा प्रायोजक बँकेकडून (जे लागू असेल त्याप्रमाणे) युपीआय यंत्रणेअंतर्गत संबंधित बोली रकमा ब्लॉक केल्या जातील. अँकर इन्वेस्टर्सना एएसबीए प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याची परवानगी नाही.

रेड हेरिंग प्रोस्पेक्टसमार्फत प्रस्तुत करण्यात आलेले इक्विटी शेयर्स बीएसई लिमिटेड (बीएसई) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड (एनएसई) या दोन्हींमध्ये सूचिबद्ध करण्यासाठी प्रस्तावित आहेत.

या ऑफरचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड, ऍक्सिस कॅपिटल लिमिटेड, आयआयएफएल सिक्युरिटीज लिमिटेड आणि एमके ग्लोबल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड हे आहेत.

या वृत्तामध्ये नमूद करण्यात आलेल्या ज्या सर्व कॅपिटलाइज्ड शब्दांची व्याख्या दिली गेलेली नाही त्यांचा अर्थ आरएचपीमध्ये देण्यात आल्याप्रमाणे आहे.