ऑर्किड्स द इंटरनॅशनल स्कूल पुणे येथे अंतराळ संशोधन मेळा

पुणे, मे २०२४:  ऑर्किड्स द इंटरनॅशनल स्कूल येथे ‘गो कॉस्मो’ अंतराळ संशोधन मेळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे.  मुलांच्या कल्पनेला आणि कुतूहलाला पंख देणाऱ्या रोमांचक क्रियाकलापांनी भरलेला हा मेळा असणार आहे. अंतराळयान बनवण्यापासून ते ताऱ्यांमध्ये डोकावण्यापर्यंत, हा कार्यक्रम खगोलशास्त्राचा अतुलनीय अनुभव देईल. हा मेळा सर्व वयोगटातील लोकांसाठी मनोरंजक क्रियाकलापांसह अवकाश संशोधनाची आवड निर्माण करणारा असणार आहे.

ऑर्किड्स द इंटरनॅशनल स्कूल,ताथवडे कॅम्पस येथे २४ ते २६ मे दरम्यान तीन दिवस दुपारी ४ ते रात्री १० वाजेपर्यंत ‘गो कॉस्मो’ मेळा असणार आहे. प्रवेश विनामूल्य असणार आहे. नोंदणीसाठी संकेतस्थळ : https://t.ly/VXcYg