Crime Story : दोन पतींना सोडले, मेव्हण्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिप, नात्याची झाली अशी अखेर

Crime Story : कसबा पाटला येथील जगतपुरी कॉलनीत रहाणारी राखी हिची दोन लग्ने झाली होती. पहिले लग्न हुसैनपूर गावात झाले. तर, दुसरे लग्न गाझियाबादमध्ये झाले होते. तिची दोन्ही लग्ने फार काळ टिकली नाहीत. राखी एका खासगी कंपनीत कामाला होती. दोन लग्ने टिकली नाहीत त्यामुळे ती उदास होती. ती तिची मामे बहिणीकडे सतत जायची.

यातून तिचे मामे बहिणीच्या पतीसोबत सुत जुळले. बऱ्याच दिवसांपासून ते दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये रहात होते. त्याच्या या रिलेशनशिपला मामे बहिणीनीने सुद्धा मान्यता दिली होती. पण, सुखासुखी सुरु असलेल्या या नात्याचा अंत दुखद झाला. राखी हिची क्रूरपणे हत्या करण्यात आली होती.

कसबा पाटलाचे रहिवाशी कृष्णपाल सिंह यांना राखी आणि अमित अशी दोन मुले. राखीचे लग्न त्यांनी हुसैनपूर गावातील तरुणाशी लावून दिले. पण काही दिवसातच त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर काही महिन्यांनी राखीने दुसरे लग्न केले. मात्र, तो ही विवाह टिकला नाही. दुसऱ्या पतीपासूनही ती विभक्त झाली.

तिने गाझीयाबादमध्ये एका खाजगी कंपनीत नोकरी धरली. याचकाळात तिचे मामे बहिणीच्या घरी येणे जाणे वाढू लागले. दरम्यान तिचे आणि मामे बहिणीच्या पतीसोबत प्रेम संबध जुळून आले. ते दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. तिच्या बहिणीलाही यावर काही आक्षेप नव्हता. मात्र, शनिवारची सकाळ राखीसाठी अखेरची सकाळ ठरली.

राखी हिचा भाऊ अमित तिच्या घरी गेला असता त्याला राखीचा मृतदेह जमिनीवर पडलेला दिसला. तिच्या मानेवर आणि हातावर जखमेच्या खुणा होत्या. अमित याने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. अमित याने मोदीनगर पोलिस ठाण्यात मेव्हणा आणि त्याच्या कुटुंबीयांवर खून केल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी अनेकांना ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली आहे.

तपास अधिकारी एसीपी ज्ञान प्रकाश राय यांनी याबबत माहिती देताना सांगितले की, प्रथमदर्शनी हे प्रकरण आत्महत्या असल्याचे दिसते. परंतु, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. महिलेच्या भावाने दिलेल्या फिर्यादीनुसार चौकशी सुरु आहे. त्यानंतर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले.