Pune porsche accident : पोर्शे कार अपघात प्रकरण : पुणे आयुक्तांनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले…

By: Editor_Pratik

On: Sunday, May 26, 2024 5:49 PM

Google News
Follow Us

Pune porsche accident : पोर्शे कार अपघात प्रकरणातील आपल्‍या नातवाला वाचविण्‍यासाठी सुरेंद्रकुमार अग्रवाल याने ड्रायव्हर गंगाराम पुजारी याला दाेन दिवस डांबून ठेवले. तु जर खर बोललास जर तुला बघून घेईन अशी धमकीही दिली, अशी धक्कादायक माहिती आज (दि.२५मे) पुणे पाेलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली. (Pune porsche accident)

पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या आजोबांनी कार चालकाला डांबून ठेवले.

तु जर खर बोललास तर तुला बघून घेईन अशी धमकी ड्रायव्हर गंगाराम पुजारी याला दिली.

आजोबांवर अपहरण आणि धमकीचा गुन्हा दाखल झाला आहे

हेही वाचा : Pune Porsche Accident : महागडी पोर्श कार अल्पवयीन आरोपीला वाढदिवसानिमित्त मिळाली होती भेट

तू जर खर बोललास तर…

पत्रकार परिषदेत पुणे पाेलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की, तू जर खर बोललास जर तुला बघून घेईन, अशी धमकी संशयित अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल याने कार ड्रायव्हर गंगाराम पुजारी याला दिली. गंगाराम पुजारी याला दोन दिवस घरी न पाठवता तब्बल ४८ तास डांबून ठेवेल. आपल्या नातवारील आरोप स्वत:वर घे असा दबाव आणला. आरोप स्‍वत:वर घेतले नाहीस आणि तू जर खर बोललास जर तुला बघून घेईन. अशी धमकीही त्‍याला दिली.”

हेही वाचा : BIG NEWS : 5 स्टार हॉटेलमध्ये मोठ्या घरातील 16 मुली करत होत्या असे काम; पोलिसांनी कुटुंबियांनाच दाखवली ही परिस्थिती…बसला मोठा धक्का; 15 पोलीस ठाण्यांची एकत्र कारवाई

मद्यधुंद अल्पवयीन मुलाने भरधाव पोर्श कारने चालवत रविवारी (दि.१९) पुण्यातील दाेन आयटी इंजिनिअरला चिरडले. अश्विनी कोस्टा व अनिस अवधिया असे मृत तरुण-तरुणीचे नाव आहे. अश्विनी ही मूळची मध्य प्रदेशमधील जबलपूर येथील आहे. तर अनिसची आई-वडील वृद्ध असून, अनिस हा त्यांचा एकमेव मुलगा होता. दोघांनीही त्यांचे कम्प्युटर सायन्सचे शिक्षण पूर्ण केले होते.

दरम्यान अल्पवयीन संशयित आरोपीने पाेलिसांना सांगितले आहे की, मी दारु पीत असल्‍याचे वडिलांना माहित होते. त्यांनीच मला कार दिली. या प्रकरणी दाखल गुन्‍ह्यात नमूद करण्‍यात आलं आहे की, “आरोपीकडे वैध वाहन परवाना आणि कार चालवण्याचे वैध प्रशिक्षण नाही, हे माहित असुनही त्याच्या वडिलांना त्याला कार चालवायला दिली होती. त्याचबरोबर त्याला पार्टी करायला परवानगीही दिली होती. आरोपीचे वडिल यांच्यासह चारजणांना अटक केली आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

Deshseva Foundation

September 3, 2026

Deshseva Foundation

September 3, 2026

September 2, 2026

September 1, 2026

August 27, 2026

August 25, 2026