BIG NEWS : ईव्हीएम मशीन चुकीच्या पद्धतीने लावल्याचा आरोप करत शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहराध्यक्ष सचिन भोसले यांनी गोंधळ घातला. त्यामुळे सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करीत भोसले यांना तत्काळ अटक करण्यात आली आहे. ही घटना सोमवारी (दि. १३) सकाळी थेरगाव येथे घडली.
हेही वाचा : सोनाली बेंद्रे सांगते- आम्हा बहिणींपुढे आईने एकच अट ठेवली होती, कोणाशीही लग्न करा पण….
नेमका प्रकार काय घडला : सचिन भोसले थेरगाव येथील नागु बारणे शाळेत मतदान करण्यासाठी गेले. ईव्हीएम मशीन चुकीच्या पद्धतीने लावल्याचे दिसले. मोबाईलमध्ये चित्रीकरण केले. कर्मचाऱ्यांनी त्यांना अडवले. त्यावेळी त्यांच्यात शाब्दिक वाद. सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल. मावळ लोकसभा मतदारसंघासाठी आज सकाळी मतदान सुरु झाले. दरम्यान, शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) शहराध्यक्ष सचिन भोसले थेरगाव येथील नागु बारणे शाळेत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना ईव्हीएम मशीन चुकीच्या पद्धतीने लावल्याचे दिसले. याचा जाब विचारत त्यांनी मोबाईलमध्ये चित्रीकरण केले.
वाकड पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल
मात्र, मतदान केंद्रात चित्रीकरण करण्यास बंदी असल्याने निवडणूक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना अडवले. त्यावेळी त्यांच्यात शाब्दिक वाद झाला. दरम्यान, पोलिसांनी भोसले यांना ताब्यात घेत त्यांच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास वाकड पोलिस करत आहेत.