इलेक्ट्रिक टू-व्हिलर सेगमेंटमध्ये ओला इलेक्ट्रिक स्कूटरचा बाजारात एकदम दबदबा आहे. कंपनीचा या सेगमेंटमध्ये 42 टक्के मार्केट शेअर आहे. त्याचे प्रमुख कारण कंपनीची इलेक्ट्रिक सेगमेंटमधील दमदार रेंज, पॉवरफूल बॉडी, मोठे स्टोरेज आणि वॉटरप्रुफ बॅटरी आणि बॅटरी हे आहे.
नवी दिल्ली: इलेक्ट्रिक टू व्हिलर सेगमेंटमध्ये ओला इलेक्ट्रिकचा मोठा दबदबा आहे. कंपनीचा या सेगमेंटमध्ये 42 टक्के वाटा आहे. दमदार रेंज, पॉवरफुल बॉडी, वॉटरप्रुफ बॅटरी आणि बॉडी यामुळे कंपनीने बाजारात मोठा ग्राहक वर्ग जोडला आहे. ओलाची ई-स्कूटर पाण्यात बुडवल्यानंतर पण पुन्हा त्याच जोमात धावल्याचे अनेक व्हिडिओ आपण सोशल मीडियावर पाहिले असतील. पण बाजारातील ओलाची ही एकाधिकारशाही संपविण्यासाठी एथर एनर्जीने कंबर कसली आहे. ओलाच्या बाजाराला सुरुंग लावण्याच्या तयारीने Ather Rizta बाजारात उतरविण्यात येत आहे. 6 एप्रिल रोजी Ather Rizta बाजारात दाखल होईल. त्यापूर्वीच या इलेक्ट्रिक स्कूटरचा कमरेइतक्या पाण्यातून सहज जाण्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर तो प्रचंड व्हायरल झाला आहे.
या व्हिडिओनुसार, Ather Rizta पाण्याने भरलेल्या एका टँकमधून दुसऱ्या टोकापर्यंत जाताना दिसत आहे. या चाचणी दरम्यान स्कूटर पाण्यात अर्धी बुडालेली दिसत आहे. पण तरीही ही स्कूटर त्याच वेगाने या पाण्यातून धावताना दिसत आहे. नवीन इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये वॉटरप्रुफ बॅटरी आणि मोटरचा वापर करण्यात आलेला आहे. यापूर्वी कंपनीने या स्कूटरमध्ये वापरल्या जाणाऱ्या बॅटरीला 40 फुटाहून खाली टाकले होते. या परीक्षेत ही बॅटरी पूर्णपणे खरी उतरली. एकूणच ही बॅटरी दमदार आणि दीर्घकाळासाठी योग्य असल्याचा दावा करण्यात येत आहे.
Ather Rizta ची खास वैशिष्ट्ये
All-new #AtherRizta is tested in water
एथर के नए इलेक्ट्रिक स्कूटर में वाटरप्रूफ बैटरी और मोटर मिलेगी! देखें वीडियो#AtherRizta #Ather @atherenergy pic.twitter.com/4Ro0wheRhd
— narendra jijhontiya (@JijhontiyaN) March 20, 2024
- एथरने या इलेक्ट्रिक स्कूटरची चाचणी सुरु केली आहे. कंपनी यासंबंधीचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत आहे. Ather Rizta चा आकार एथर 450X पेक्षा अधिक आहे. या स्कूटरवर दोन लोक सहज प्रवास करु शकतात. तसेच फ्लोअरबोर्ड पण मोठा असल्याने तुमचे सामान पण तिथे बसू शकते. या इलेक्ट्रिक स्कूटरचे सीट पण लांब आहे. या सीटच्या खाली मोठा बूट स्पेस एरिया मिळेल.
- Ather Rizta मध्ये हेडलाईट, टेललॅम्प, फुल एलईडी लायटिंग, फुल डिजिटल स्क्रीन, राईड मोड, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, फास्ट चार्जिंग असे फीचर्स मिळतील. एका अंदाजानुसार या स्कूटरची रेंज ही 150 किमीपेक्षा अधिक असेल. या इलेक्ट्रिक स्कूटरची एक्स-शोरुम किंमत 1.25 ते 1.45 लाखांच्या दरम्यान असेल.