रामनवमीच्या मंगल पर्वाला प्रभू श्री राम आणि हनुमान यांच्यातील अतूट नात्याचा सन्मान

राम नवमीच्या शुभ प्रसंगी, सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील श्रीमद् रामायण ही महाकाव्य गाथा प्रेक्षकांसाठी 17 एप्रिल रोजी रात्री 9 ते 10 या वेळेत 1 तासाचा विशेष भाग घेऊन येणार आहे. लंकेतून माता सीतेच्या अपहरणाचा पुरावा घेऊन येण्याबाबत भगवान हनुमानावर श्रीरामाने दाखवलेला विश्वास हा त्यांच्या निष्ठा आणि गाढ मैत्रीचा एक मार्मिक पुरावा ठरतो.

राम नवमीच्या शुभ मुहूर्तावरील मुख्य कथानकावर आपले विचार व्यक्त करताना अभिनेता सुजय रेऊ म्हणतो, “भगवान श्रीरामाचा हनुमंतावर पूर्ण विश्वास आहे आणि माता सीता लंकेत आहेत याचे पुरावे शोधण्यासाठी आवश्यक ते सर्व काही करण्याचा हनुमानाने निर्धार केला आहे. हनुमानाचे श्रीरामाप्रती अढळ समर्पण, त्याच्या निष्ठावान कृती आणि सीतेचा निश्चित ठावठिकाणा शोधण्याची त्याची वचनबद्धता हे केवळ एक कार्य नव्हे तर योग्य ते सर्व काही करण्याच्या अढळ विश्वासाचे प्रतीक आहे. हनुमान एक दीपस्तंभ आहे, मार्गदर्शक आहे आणि सर्वात अवघड कामगिरीवर देखील भक्ती आणि श्रद्धेने विजय मिळवता येतो हे तो सिद्ध करून दाखवेल.”

सुजय रेऊ पुढे म्हणतो, “राम नवमीच्या शुभ मुहूर्तावरील 1 तासाच्या विशेष भागामध्ये हनुमान अंगठी घेऊन सीता मातेच्या शोधात निघतो, हे प्रेक्षकांना दिसेल. पुढे येणार्‍या एपिसोड्समध्ये, हनुमानाने लंकेला पोहोचण्यासाठी केलेले नाना प्रयत्न, त्याला आलेल्या अडचणी आणि माता सीतेला त्याने अंगठी देणे हे पाहणे मनोरंजक असेल.”

या रामनवमीला, बघा ‘श्रीमद् रामायण’ मालिकेचा 1 तासाचा विशेष भाग रात्री 9 ते 10, फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर!