चीनमध्ये जाणवले जोरदार भूकंपाचे धक्के; ५.७ रिश्टर स्केल एवढा मोठा भूकंप

चीनमध्ये जोरदार भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. भारताच्या शेजारी असलेला देश चीनमधील जिजांग प्रांतात हे धक्के जाणवले आहेत. आज सकाळी ११.१४ वाजता ५.७ रिश्टर स्केल भूकंपान चीनमधील जमीन हादरली. या संदर्भातील माहिती भारत सरकारच्या नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी या एजन्सीने एक्स अकाऊंटवरून दिली आहे.

नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) ही देशातील भूकंप क्रियाकलापांवर देखरेख ठेवणारी भारत सरकारची नोडल एजन्सी आहे. या एजन्सीने चीनमध्ये ५.७ रिश्टर स्केल इतकी तीव्रता नोंदवली आहे. एजन्सीने सांगितले की, या भूकंपाचा केंद्रबिंदू 10 किमी (6.2 मैल) खोलीवर होता. भूकंपाची तीव्रता अधिक असली तरी, यामध्ये कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती नाही, असे देखील स्थानिक माध्यमांनी स्पष्ट केले आहे.