22 मार्च 2024– इलेक्ट्रिकल वस्तूंमधील एक आघाडीची कंपनी पॉलीकॅब इंडिया लि. ने पॉलीकॅब सायलेंसिओ मिनी ॲडव्हान्स्ड बीएलडीसी पंखा लॉंच केला आहे. या नवीन पंख्यांमुळे सिलिंग पंखाच्या क्षेत्रात क्रांती घडणार आहे. सिलिंग पंख्यांमधील उत्कृष्ट डिझाइनसह ऊर्जेचा योग्य वापर आणि कार्यक्षमतेचे एक सर्वोत्तम मानक तयार झाले आहे. आजच्या काळातील हा पंखा समकालीन डिझाइनसह आधुनिक बीएलडीसी तंत्रज्ञानाला प्राधान्य देतो, ज्यामुळे 65% पर्यंत विजेची बचत होते*, पंख्याचा आवाज कमी असतो आणि तुम्ही कमी स्पीडमध्ये जरी तो सुरू केला तरी देखील चांगला वारा लागतो. सायलेंसिओ मिनी ॲडव्हान्स्ड बीएलडीसी पंखा तुमच्या वार्षिक वीज बिलावर 2,500/-*. रुपयांपर्यंत बचत करण्यात मदत करतो. प्रत्येक ग्राहकाच्या गरजेनुसार 1200 mm, 900 mm, 600 mm आणि 9 विविध रंगांमध्ये उपलब्ध आहे.
केबल्स आणि वायर्सच्या उत्पादनात उत्कृष्टतेसाठी प्रसिद्ध असलेल्या पॉलीकॅबने आधुनिक, डिजिटली कनेक्टेड घरांसाठी इलेक्ट्रिकल सोल्यूशन्सचे अनेक पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. ‘Ideas. Connected’, या कंपनीच्या नवीन टॅगलाईन सोबत जोडले गेलेले एक उत्तम उदाहरण म्हणजे सायलेंसिओ मिनी बीएलडीसी पंखा. हा पंखा कंपनीचा दृष्टिकोन, ग्राहकांबाबत करत असलेला विचार योग्यरित्या पोहोचवतो.
पॉलीकॅब सायलेंसिओ मिनी बीएलडीसी पंख्याला 5-स्टार बीईई रेटिंग मिळाले असून त्याला त्याचा सार्थ अभिमान आहे. हे रेटिंग पॉलीकॅबच्या ऊर्जा कार्यक्षमतेसाठी अतूट वचनबद्धतेचे समर्थन करतो. सायलेंसिओ मिनी नवीनतम RF Point Anywhere Remote सह येतो. हे एक नवीन तंत्रज्ञान आहे जे तुम्ही पंख्यापासून लांब असलात, आणि रिमोटची दिशा दुसरीकडे असली तरी कार्य करते. तसेच, तुम्ही या तंत्रज्ञानासह एका रिमोटशी 50 पंखे जोडू शकता. त्यामुळे, जर तुम्ही तुमच्या घरात Polycab बीएलडीसी पंखे वापरत असाल, तर सर्व पंखे एकाच रिमोटने जोडले जाऊ शकतात. सायलेंसिओ मिनी अल्टिमेट 25 स्पीड सेटिंगसह येते जे तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार पंख्याचा स्पीड कमी – जास्त करण्याची सुविधा देते.
त्याच्या बूस्ट++ मोडमध्ये, हा पंखा 380 RPM हाय-स्पीडवर चालतो आणि 235 CMM एअर डिलिव्हरी क्षमतेसह हवेचे उत्कृष्ट व्यवस्थापन करतो. यामुळे वर्षभर थंड आणि आरामदायी वातावरण मिळण्याची खात्री होते. कॉम्पॅक्ट बीएलडीसी मोटरच्या साहाय्याने तयार केलेला हा पंखा त्याचे सौंदर्य तर वाढवतोच त्यासोबतच या रचनेमुळे त्याचे ब्लेड्स लांब दिसतात. टिकाऊपणा आणि कार्यक्षमता या दोन्हीही गोष्टी त्याचे वैशिष्ट्य आहे. पंख्यामध्ये रिव्हर्स रोटेशन मोड देखील आहे, त्यामुळेच हिवाळ्यासाठी आणि वातानुकूलित खोल्यांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे. कारण अशा वातावरणात तो हवा केवळ खेळती ठेवतो, ज्यामुळे प्रसन्न वाटते.
पॉलीकॅबच्या रुरकी येथील जागतिक दर्जाच्या उत्पादन केंद्रात सायलेंसिओ मिनी ची निर्मिती केली जाते. उत्कृष्ट उत्पादनाची गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी पॉलीकॅब बॅकवर्ड इंटिग्रेशनमध्ये गुंतवणूक करण्यावर विश्वास ठेवतो. म्हणूनच, सायलेंसिओ मिनी बीएलडीसी पंख्यासाठी पीसीबी उत्पादनाची आवश्यक इन-हाउस व्यवस्था विकसित केली आहे. नियमित प्रीमियम पंख्यांपेक्षा पॉलीकॅब सायलेंसिओ मिनी बीएलडीसी पंखा ५०% अधिक वॉरंटी देते. याला 3 वर्षांची वॉरंटी मिळते. नोंदणी केल्यावर अतिरिक्त एक वर्षाच्या वॉरंटीसह एकूण 4 वर्षांची वॉरंटी मिळते. या पंख्यासह, पॉलीकॅब ग्राहकांना 4 वर्षांसाठी संपूर्ण मनःशांती आणि वॉरंटी कालावधीत 10,000/-* रु. पर्यंतच्या बचतीची खात्री देते.
नॅचरल वॉलनट वुड, नॅचरल वुड, बर्किन गोल्ड, कूल ग्रे, मॅट एक्स्प्रेसो ब्राउन, पर्ल बेज, पर्ल ब्राउन, मॅट सॅटिन व्हाइट आणि मॅट ब्लॅक यासह नऊ आकर्षक रंगांसह सायलेंसिओ मिनी 1200 mm, 900 mm आणि 600 mm. स्वीप आकारात उपलब्ध आहे. पर्यायांची ही सर्वसमावेशक