पिरामल फायनान्सचा या वर्षी सुवर्ण कर्ज आणि सूक्ष्म कर्ज क्षेत्रात प्रवेश

मुंबई: पिरामल एंटरप्रायझेस लिमिटेडची पूर्ण मालकीची उपकंपनी असलेल्या पिरामल फायनान्सने आगामी आर्थिक वर्षात पारंपारिक सुवर्ण कर्ज व्यवसाय आणि जोखमीची मायक्रोफायनान्स कर्जे सादर करून उत्पादन पोर्टफोलिओमध्ये विविधता आणण्याची योजना आखली आहे. यासह, कंपनी ग्राहकांच्या सतत बदलत्या गरजा पूर्ण करेल आणि ग्राहक वित्त दृष्टीकोन विस्तृत करेल. हे धोरणात्मक पाऊल त्यांच्या पारंपरिक रिअल इस्टेट-प्रणीत व्यवसाय मॉडेलपासून लक्षणीय बदल दर्शवते.

संबंधित जोखीम असूनही, कंपनी या नवीन उपक्रमांचे प्रभावी व्यवस्थापन सुनिश्चित करून तिच्या मजबूत अंडररायटिंग क्षमतेवर विश्वास ठेवते. ही धोरणात्मक वाटचाल पिरामल फायनान्सच्या अधिक संतुलित पोर्टफोलिओकडे संक्रमण जाण्याच्या उद्दिष्टाशी सुसंगत असून किरकोळ कर्जे त्याच्या व्यवस्थापनाखालील मालमत्तेचा (AUM) महत्त्वपूर्ण भाग बनवतात.

लहान दुकाने किंवा मालमत्ता यांसारख्या मालमत्तांचा तारण म्हणून वापर करत संभाव्यतः १० लाख रुपयांपेक्षा कमी लहान-तिकीट कर्ज सादर करण्यास पिरामल फायनान्स तयार आहे. या विभागातील वाढीची क्षमता ओळखून, कंपनीने उदयोन्मुख संधींचा फायदा घेण्याचे आणि बाजारपेठेत आपले  स्थान वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. कंपनीच्या AUM च्या ७०,८२३ कोटी रु. च्या तुलनेत तिचा सध्याचा मायक्रोफायनान्स व्यवसाय १,००० कोटी रु. इतका कमी असला तरी, कंपनीच्या विस्तृत मालमत्ता व्यवस्थापन पोर्टफोलिओमध्ये ते एक धोरणात्मक फोकस क्षेत्र आहे.

कंपनीने २५ राज्ये, ६२५ जिल्ह्यांमध्ये पसरलेल्या, देशभरातील ३६९ हून अधिक गाव आणि शहरे व्यापून आपले शाखा नेटवर्क ४७० पेक्षा जास्त विस्तारले आहे. आर्थिक वर्ष २०२५ मध्ये आणखी १०० शाखांची भर घालून शाखा नेटवर्क वाढवण्याची योजना असून १,००० ठिकाणी ६०० शाखांचे मजबूत नेटवर्क करण्याचे उद्दिष्ट आहे. या विस्ताराचे उद्दिष्ट टियर-II, टियर-III शहरे आणि टियर-I शहरांच्या बाहेरील भागातील ग्राहकांपर्यंत पोहोचणे आहे.

किरकोळ आणि घाऊक यांच्यातील मिश्रणाने आर्थिक वर्ष २८ पर्यंत ७०% किरकोळ आणि ३०% घाऊक विक्रीच्या लक्ष्याकडे वेगाने प्रगती करत रिटेल व्यवसाय एकूण AUM वाढवतो. आर्थिक वर्ष २८ पर्यंत कंपनीचे AUM दुप्पट करून १.२-१.३ लाख कोटी रु. करण्याचे उद्दिष्ट आहे.

पिरामल फायनान्सचे व्यवस्थापकीय संचालक जयराम श्रीधरन म्हणाले, “या आर्थिक वर्षात आमच्या पोर्टफोलिओमध्ये सुवर्ण कर्ज, सूक्ष्म व्यवसाय कर्जे आणि जोखमीची मायक्रोफायनान्स कर्जे यांची भर घालत आम्ही आमचा ग्राहक वित्त दृष्टीकोन विस्तारत आहोत आणि तशी योजना आखत आहोत. जास्त जोखीम असूनही, आमच्याकडे त्या हाताळण्याची, सर्वसमावेशक उपाय प्रदान करण्यासाठी आमची बांधिलकी प्रतिबिंबित करण्याची आणि आर्थिक समावेशनाला चालना देण्याची अंडरराइटिंग क्षमता आहे.”

‘हाय टच’ आणि ‘हाय टेक’ धोरणासह पिरामल फायनान्सच्या नाविन्यपूर्णतेने भारतातील लोकांची सेवा करण्याची क्षमता वाढविण्यासाठी एक बहु-उत्पादन रिटेल लेंडीग विकसित होण्यास मदत केली आहे. कंपनी गृहकर्ज, व्यवसाय कर्ज, वैयक्तिक कर्ज, युज्ड कार कर्जे यासह १३ हून अधिक कर्ज उत्पादनांची श्रेणी सादर करते.